शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेस्सीला मागे टाकत रोनाल्डो बनला सर्वात जास्त कमाई करणारा फुटबॉलर, कमाई वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:36 PM

1 / 7
फोर्ब्सने २०२१ मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या फुटबॉलर्सची यादी जाहीर केली आहे. यात पोर्तुगालचा क्रिस्टीयानो रोनाल्डो १२५ मिलियन डॉलर(९२२ कोटी रूपे) कमाईसोबत टॉपवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अर्जेंटीनाचा लिओनेल मेस्स आहे ज्याने ११० मिलियन डॉलर(८११ कोटी रूपये) कमावले.
2 / 7
मॅनचेस्टर यूनायटेडचा स्ट्रायकर रोनाल्डोची कमाई गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढली आहे. रोनाल्डोने २०२० मध्ये ५८५ कोटी रूपये कमावले होते. यावर्षी त्याची ६४ कोटी रूपयांनी कमाई वाढली. रोनाल्डोचा पगार ७० मिलियन डॉलर आहे. तर त्याने जाहिरातींमधून ५५ मिलियन डॉलरची कमाई केली.
3 / 7
बार्सिलोना सोडून पॅरिस सेंट जर्मेनशी जुळणारा लिओनेल मेस्सीची कमाई यावर्षी घटली. गेल्यावर्षी मेस्सीने ९२४ कोटी रूपयांची कमाई केली होती. तर यावर्षी त्याने ८११ कोटी रूपये कमावले. मेस्सीची सॅलरी ७५ मिलियन डॉलर आहे तर त्याने जाहिरातींमधून ३५ मिलियन डॉलरची कमाई केली. सॅलरीच्या बाबतीत मेस्सी आताही रोनाल्डोच्या पुढे आहे. पण जाहिरात विश्वावर रोनाल्डोचा जलवा आहे.
4 / 7
या यादीत तिसऱ्या स्थानावर ब्राझीलचा सुपरस्टार फुटबॉलर नेमार आहे. नेमारने यावर्षी ९५ मिलियन डॉलर(७०१ कोटी रूपये) कमाई केली आहे. गेल्यावर्षी त्याने ७०४ कोटी रूपयांची कमाई केली होती. नेमारला ७५ मिलियन डॉलर सॅलरी आहे तर २० मिलियन डॉलर त्याने जाहिरातीतून कमावले.
5 / 7
२२ वर्षीय किलियन एमबापे सध्या फ्रेंच क्लब पीएसजीसाठी खेळतो. फ्रान्सीसी फुटबॉलरने यावर्षी ४३ मिलियन डॉलर (३१७ कोटी रूपये) कमाई केली. याचीही कमाई गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली आहे.
6 / 7
फोर्ब्स यादीत पाचव्या क्रमांकावर लिवरपूलचा स्टार खेळाडू मोहम्मद सालाह आहे. त्याने यावर्षी ४२ मिलियन डॉलर(३०२ कोटी रूपये) ची कमाई केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सालाहची कमाई ३१ कोटी रूपयांनी वाढली आहे. सालाहने २०२० मध्ये २७१ कोटी रूपये कमाई केली होती.
7 / 7
तर या यादीत ७व्या क्रमांकावर आहे स्पेनचा आंद्रे इनिएस्ता. त्याची कमाई ३७ मिलियन डॉलर(२७२ कोटी रूपये). त्यानंतर ८व्या क्रमाांकावर पॉल पोग्बा (२५० कोटी रूपये), ९व्या क्रमांकावर गेरेथ बेल (२३६ कोटी रूपये) आणि १०व्या क्रमांकावर एडेन हेजार्ड (२१३ कोटी रूपये) आहे.
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉलForbesफोर्ब्स