शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Neeraj Chopra : तुम्हाला माहित्येय का? गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी भारत सरकारनं खर्च केले किती कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 6:17 PM

1 / 9
भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णवेध घेताना १३० कोटी भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवले. ऑलिम्पिक स्पर्धेत १२५ वर्षांच्या इतिहासात भारताचे हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले अन् तेही सुवर्ण... १३ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये राष्ट्रगीत ऐकू आले. २००८मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं देशवासीयांना हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यास लावला होता.
2 / 9
पण, नीरजच्या या ऐतिहासिक यशामागे भारत सरकारचाही मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी नीरजसाठी किती कोट्यवधी खर्च केलेत, हे तुम्हाला माहित आहे का?
3 / 9
२३ वर्षीय भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. त्यानं पहिल्या दोन प्रयत्नात ८७ मीटर अंतर पार केले अन् प्रतिस्पर्धी त्याच्या जवळपासही पोहोचले नाही. प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.
4 / 9
नीरजनं २०१६मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक नावावर केले अन् तेही ८६.४८ मीटर लांब भालाभेक करून २० वर्षांखालील गटात वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
5 / 9
त्यानंतर २०१८साली पार पडलेल्या आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम नीरज चोप्रानं केला. त्यानं ८८.०७ मीटर भालाफेक करताना स्वतःच्याच नावावरील राष्ट्रीय विक्रम मोडला. २०१८च्या आशियाई स्पर्धेत त्यानं ८८.०६ मीटर लांब भालाफेक केली होती. त्या स्पर्धेत तो भारताचा ध्वजधारक होता.
6 / 9
पण, आशियाई स्पर्धेनंतर नीरजच्या हाताचा कोपरा दुखावला गेला अन् त्याला भालाफेक करताना अडचण होऊ लागली. त्याला अहस्य वेदना होत होत्या. मे २०१९मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आणि त्यानंतर तो पुनर्वसन केंद्रात गेला. जानेवारी २०२०मध्ये त्यानं दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेतून कमबॅक केले. त्यानं ८७.८६ मीटर लांब भालाफेक करून टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट पटकावले.
7 / 9
नोव्हेंबर २०१८मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ( Sports Authority of India (SAI) ) टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम ( Target Olympic Podium Scheme (TOPS) ) मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयानं खेळाडूंचे वार्षिक सराव अन् स्पर्धांचे वेळापत्रक तयार केलं आणि त्यातून अॅथलेटिक्स महासंघाला काही निधी दिला गेला व त्यापैकी काही रक्कम नीरजवर खर्ची करण्यात आली.
8 / 9
२०१६ ते २०२१ या कालावधीत नीरजवर जवळपास ७ कोटी रुपये खर्च केले गेले. यात परदेशात झालेल्या स्पर्धा व प्रशिक्षणासाठी ४ कोटी ८५ लाख ३९,६३९ रुपये, प्रशिक्षकांच्या पगारावर १ कोटी २२ लाख २४,८८० रुपये आणि भालाफेकीसाठी लागणारे क्रीडा साहित्या यावर ४ लाख ३५ हजार असे एकूण ६ कोटी ११ लाख ९९,५१८ रुपये खर्च केले गेले.
9 / 9
नीरजच्या या अविश्वसनीय कामगिरीनंतर १३ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे राष्ट्रगीत ऐकू आले. यावेळी तमाम भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. या विजयानंतर नीरज चोप्रावर बक्षीसांचा धो धो पाऊस पडला, ३ तासांच्या आत त्याच्यासाठी जवळपास १६.७५ कोटी रुपयांच्या बक्षीसांची घोषणा झाली.
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्रा