शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FIFA World Cup Final: 4 गोल करूनही एमबाप्पेच्या पदरी 'निराशा', खुद्द राष्ट्रपतींनी मैदानात उतरून दिला 'धीर'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 2:50 PM

1 / 9
अर्जेंटिनाच्या संघाने 2022च्या फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि एकच जल्लोष केला. खरं तर अर्जेंटिना तब्बल 36 वर्षानंतर फिफा विश्वचषकाचा किताब जिंकला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभव केला.
2 / 9
90 मिनिटांपर्यंत स्कोर 2-2 असा बरोबरीत होता. यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला त्यामध्ये लिओनेल मेस्सी आणि कालियन एमबाप्पे यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला. त्यामुळे पुन्हा एकदा स्कोर 3-3 असा बरोबरीत झाला.
3 / 9
दरम्यान, मेस्सी आणि एमबाप्पे या दोघांनी शूटआऊटमध्ये गोल केले. पण शेवटी अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. अर्जेंटिनाचे हे एकूण तिसरे विजेतेपद आहे. यासाठी त्यांना 36 वर्षे वाट पाहावी लागली. याआधी 1986 मध्ये त्याने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर संघात अनुभवी डिएगो मॅराडोना होता.
4 / 9
23 वर्षीय कालियन एमबाप्पेने पहिला गोल 80 मिनिटाला पेनल्टीद्वारे केला. खरं तर अर्जेंटिनाने सर्वप्रथम 2 गोल करून सामन्यात आघाडी घेतली होती. मात्र एमबाप्पेने 2 मिनिटांत 2 गोल करून सामन्यात रंगत आणली. एमबाप्पेने स्कोर 2-2 असा केल्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला त्यामध्ये देखील मेस्सी आणि एमबाप्पे यांनी गोल करून स्कोर 3-3 असा बरोबरीत ठेवला.
5 / 9
मात्र शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 अशा फरकाने विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा विश्वचषकाचा किताब पटकावला. फ्रान्सच्या संघाकडून कालियन एमबाप्पेने एकतर्फी झुंज दिली मात्र त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
6 / 9
फायनलच्या सामन्यातील पराभवासह फ्रान्सचे सलग दोनवेळा विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले. 2018 मध्ये रशियात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी क्रोएशियाचा पराभव केला. अंतिम सामना हरल्यानंतर एमबाप्पे भावुक झाला. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही फायनल पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते. पराभवानंतर ते मैदानात आले आणि एमबाप्पेला धीर देण्याचा प्रयत्न केला.
7 / 9
कतारमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून मार्टिनेझला अंतिम सामन्यानंतर 'गोल्डन ग्लोव्हज' देण्यात आला. शूटआऊटच्या विजयात उत्कृष्ट पेनल्टी सेव्हर म्हणून त्याने शानदार कामगिरी केली.
8 / 9
अर्जेंटिनासाठी लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक होता. मेस्सीने फायनलच्या सामन्यात एकूण 3 गोल केले. खरं तर मेस्सीची तुलना पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत केली जाते मात्र रोनाल्डोच्या संघाला अद्याप एकही विश्वचषक जिंकता आला नाही.
9 / 9
विश्वचषकाच्या इतिहासाबद्दल भाष्य करायचे झाले तर. ब्राझीलने सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. जर्मनी आणि इटलीने 4-4 वेळा जेतेपदावर कब्जा केला आहे. अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरला. इतर कोणत्याही संघाला 3 किंवा त्याहून अधिक वेळा फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. 5 वेळा विश्वविजेता असलेल्या ब्राझीलच्या संघाला उपांत्यपूर्वी फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Lionel Messiलिओनेल मेस्सीArgentinaअर्जेंटिनाFranceफ्रान्सPresidentराष्ट्राध्यक्ष