शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FIFA World Cup 2022: मॅच हारली पण मनं जिंकली! फ्रान्सच्या शिलेदारांचं मायदेशात जंगी स्वागत, खेळाडूही झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 5:59 PM

1 / 10
अर्जेंटिनाच्या संघाने 2022च्या फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि एकच जल्लोष केला. खरं तर अर्जेंटिना तब्बल 36 वर्षानंतर फिफा विश्वचषकाचा किताब जिंकला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभव केला.
2 / 10
90 मिनिटांपर्यंत स्कोर 2-2 असा बरोबरीत होता. यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला त्यामध्ये लिओनेल मेस्सी आणि कालियन एमबाप्पे यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला. त्यामुळे पुन्हा एकदा स्कोर 3-3 असा बरोबरीत झाला.
3 / 10
दरम्यान, मेस्सी आणि एमबाप्पे या दोघांनी शूटआऊटमध्ये गोल केले. पण शेवटी अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. अर्जेंटिनाचे हे एकूण तिसरे विजेतेपद आहे. यासाठी त्यांना 36 वर्षे वाट पाहावी लागली. याआधी 1986 मध्ये त्याने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर संघात अनुभवी डिएगो मॅराडोना होता.
4 / 10
सेंट्रल पॅरिसमधील हजारो समर्थकांनी विश्वचषक फायनलमधील पराभवानंतरही आपल्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. सर्वात रोमहर्षक सामन्यात पराभूत झाल्यानंतर फ्रान्सचा संघ मायदेशी परतला. कालियन एमबाप्पे आणि त्याचे सहकारी रात्री 8 वाजता दोहाहून चार्ल्स डी गॉल विमानतळावर उतरले. खेळाडू निराश होऊन विमानातून निघून गेले पण विमानतळ कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत 'धन्यवाद' आणि 'पॅरिस लव्ह यू' अशा आशयाचे पोस्टर दाखवून केले.
5 / 10
मात्र संघाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अंतिम फेरीत अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर दुःख अजूनही दिसत होते. फ्रान्सचे खेळाडू विमानतळावरून खाली उतरले तेव्हा तिथे हजारो समर्थक त्यांची वाट पाहत होते. समर्थकांचा उत्साह पाहून संघाचाही उत्साह परतला.
6 / 10
खरं तर फ्रान्सचा संघ 2018च्या विश्वचषकाचा विजेता आहे. रशियात पार पडलेल्या या स्पर्धेत फ्रान्सने जेतेपदाचा किताब पटकावला होता. मात्र संघाला सलग दोनवेळा हा मान पटकावण्यात अपयश आले. मात्र फ्रान्सच्या संघाने अप्रतिम खेळ दाखवून सर्व जगाला प्रभावित केले.
7 / 10
खासकरून 23 वर्षीय कालियन एमबाप्पेने 4 गोल करून फायनलचा सामना अविस्मरणीय केला. एमबाप्पेने एकतर्फी झुंज दिली मात्र तो संघाला विजय देऊ शकला नाही. आपल्या खेळाडूंचे मायदेशात स्वागत करताना चाहत्यांनी थंडीची पर्वा न करताना विश्वचषकातील शिलेदारांचा दणक्यात स्वागत केले.
8 / 10
फायनलच्या सामन्यातील पराभवासह फ्रान्सचे सलग दोनवेळा विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले. 2018 मध्ये रशियात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी क्रोएशियाचा पराभव केला. अंतिम सामना हरल्यानंतर एमबाप्पे भावुक झाला. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही फायनल पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते. पराभवानंतर ते मैदानात आले आणि एमबाप्पेला धीर देण्याचा प्रयत्न केला.
9 / 10
कतारमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून मार्टिनेझला अंतिम सामन्यानंतर 'गोल्डन ग्लोव्हज' देण्यात आला. शूटआऊटच्या विजयात उत्कृष्ट पेनल्टी सेव्हर म्हणून त्याने शानदार कामगिरी केली.
10 / 10
विश्वचषकाच्या इतिहासाबद्दल भाष्य करायचे झाले तर. ब्राझीलने सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. जर्मनी आणि इटलीने 4-4 वेळा जेतेपदावर कब्जा केला आहे. अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरला. इतर कोणत्याही संघाला 3 किंवा त्याहून अधिक वेळा फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. 5 वेळा विश्वविजेता असलेल्या ब्राझीलच्या संघाला उपांत्यपूर्वी फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२FootballफुटबॉलFranceफ्रान्स