ऑनलाइन टीममुंबई, दि. १४ - रविवारी फिफाविश्वचषकाच्या फायनलमध्ये बाजी मारुन जर्मनीने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. सर्वाधिक वेळा ब्राझीलने (पाच वेळा) विश्वचषक पटकावले असून इटलीने चार वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. १९३० मध्ये फुटबॉल खेळणा-या देशांसाठी फिफा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. उरुग्वेत पार पडलेल्या या विश्वचषकात १३ देश सहभागी झाले होते. १३ जूलै ते ३० जूलैमध्ये पार पडलेल्या या विश्वचषकात १८ सामने पार पडले. तर एकूण ७० गोल मारण्यात आले होते. या पहिल्या वहिल्या विश्चचषकात तब्बल ५, ९०, ५४९ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. २०१४ मध्ये ब्राझीलमध्ये २० वे फिफा विश्वचषक पार पडले. यंदा ३२ संघ विश्वचषकात सहभागी झाले होते. तर एकूण ६४ सामने पार पडले. यंदा जर्मनीने बाजी मारुन आपणच फुटबॉलचे सम्राट असल्याचे सिद्ध केले आहे. जर्मनीला ३५ मिलीयन डॉलर्स पुरस्कार राषी मिळाली आहे. आत्तापर्यंत विश्वचषक विजेत्या संघांची नावेवर्ल्डकपअंतिम सामनागोल विजेता संघ२०१४जर्मनी अर्जेंटिना १-० जर्मनी२०१०स्पेन नेदरलँड १-०स्पेन २००६इटली फ्रान्स ५-३ (पेनल्टी शूटआऊट)इटली २००२ब्राझील जर्मनी २-० ब्राझील १९९८ फ्रान्स ब्राझील ३-०फ्रान्स १९९४ ब्राझील इटली ३-२ (पेनल्टी शूटआऊट)ब्राझील १९९०पश्चिम जर्मनी अर्जेंटिना १- ०पश्चिम जर्मनी १९८६अर्जेंटिना पश्चिम जर्मनी ३- २अर्जेंटिना १९८२इटली पश्चिम जर्मनी ३- १इटली १९७८अर्जेंटिना नेदरलँड ३- १अर्जेंटिना १९७४पश्चिम जर्मनी नेदरलँड २- १ पश्चिम जर्मनी १९७०ब्राझील इटली ४- १ब्राझील १९६६इंग्लंड पश्चिम जर्मनी ४- २इंग्लंड १९६२ब्राझील झेकोस्लोव्हाकिया ३-१ ब्राझील १९५८ब्राझील स्वीडन ५-२ब्राझील १९५४पश्चिम जर्मनी हंगेरी ३-२पश्चिम जर्मनी १९५०उरुग्वे ब्राझील २-१उरुग्वे १९३८ इटली हंगेरी ४-२ इटली १९३४इटली झेकोस्लोव्हाकिया २-१इटली १९३०उरुग्वे अर्जेंटिना ४-२उरुग्वे