शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paris Olympic 2024 : खचली पण लढली! भारताला पहिलं पदक मिळवून देणारी Manu Bhaker कोण? PHOTOS

By ओमकार संकपाळ | Published: July 28, 2024 4:08 PM

1 / 15
मनू भाकरने आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर शनिवारी १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठली. मग रविवारी ऐतिहासिक कामगिरी करताना मनूने कांस्य पदकाला गवसणी घातली.
2 / 15
मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमधील अपयश भरून काढण्यात तिला यश आले. पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताला मनू भाकरच्या रूपात भारतीयांना आशावादी बातमी ऐकायला मिळाली.
3 / 15
पिस्तूल खराब झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला पुढील फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेबाहेर होताच ती भावुक झाली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते.
4 / 15
नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
5 / 15
सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले.
6 / 15
मनू भाकरने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१८ मध्ये ब्यूनस आयर्समधील मनूची कामगिरी खूप प्रभावी ठरली. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला.
7 / 15
यामुळे युवा ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारी मनू पहिली भारतीय नेमबाज ठरली. तिने वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांसह ISSF विश्वचषक स्पर्धांमध्ये अनेक पदके देखील जिंकली आहेत.
8 / 15
भारताची स्टार मनूने वयाच्या १६ व्या वर्षी ग्वाडालजारा येथे २०१८ ISSF विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धा जिंकली. तेव्हा तिला पहिले सुवर्ण पदक मिळाले.
9 / 15
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिचे यश कायम राहिले, जिथे तिने त्याच स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याशिवाय २०१९ मध्ये जकार्ता येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अभिषेक वर्मासोबत तिने सुवर्ण पदक जिंकण्यात यश मिळवले होते.
10 / 15
who is manu bhaker in marathi
11 / 15
आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.
12 / 15
माझ्या आई-वडिलांनी मला मनापासून साथ दिली. आज मी माझ्या देशासाठी जे काही करू शकले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या पालकांना जाते, असे मनू सांगते.
13 / 15
मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल खेळणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
14 / 15
रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
15 / 15
प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या कोरियन शूटर्संनी वर्चस्व कायम ठेवत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. अखेर मनूला कांस्य पदक जिंकता आले. लक्षणीय बाब म्हणजे शूटिंगमध्ये पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत