शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"भारतात पुरेशा सुविधा नाहीत म्हणूनच...", खेळाडूंचं भवितव्य अन् सानियानं व्यक्त केली खदखद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 4:07 PM

1 / 11
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनबद्दल बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान तिने भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देत सुमित नागलने पुरुष एकेरीत काही सामने जिंकले तर ते भारतासाठी खूप चांगले होईल, असे म्हटले.
2 / 11
भारतीय पुरुष एकेरी खेळाडू सुमित नागलने शनिवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर सुमित तीन वर्षांनंतर ग्रँडस्लॅमच्या मुख्य फेरीत पोहोचला आहे.
3 / 11
भारताची दिग्गज खेळाडू सानिया मिर्झाने एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सुमितने मुख्य ड्रॉमध्ये काही सामने जिंकले तर ते तिच्या आणि भारतीय टेनिससाठी चांगले होईल, अशी आशा व्यक्त केली.
4 / 11
सुमितला मुख्य फेरीत स्थान मिळण्याबद्दल तुला काय वाटते? याबद्दल सानियाने म्हटले, 'मी सुमितबद्दल खूप आनंदी आहे. मागील काही काळापासून त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तो इथे पोहोचल्याने मला आश्चर्य वाटले नाही. सुमितने काही काळापूर्वी आर्थिक संकटाचा सामना केला. अशा परिस्थितीत, ग्रँड स्लॅम हे ठिकाण आहे जिथून तो चांगले पैसे कमवू शकता. याचा भारतीय टेनिसलाही फायदा होईल आणि देशातील युवा खेळाडूंचे मनोबल वाढेल.'
5 / 11
नोवाक जोकोविचचा या क्षेत्रात दबदबा राहिला आहे. त्याने दहावेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचा वरचष्मा राहिला असला तरी रशियाचा डेनिस मेदवेदेव आणि स्पेनचा कार्लोस अल्काराझ हे खेळाडू जोकोविचला कडवे आव्हान देऊ शकतात.
6 / 11
सानिया मिर्झाने देखील जोकोविचच्या अप्रतिम खेळाचे कौतुक केले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही अनेक चांगले खेळाडू दिसत आहेत. याशिवाय जोकोविचला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अडचण येऊ शकते कारण त्याला स्टॅन वॉवरिंका, अँडी मरे आणि त्सित्सिपास यांचा सामना करावा लागू शकतो, हे सर्व माजी ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहेत. त्यामुळे जोकोविचचा मार्ग सोपा नसेल, असे सानियाने सांगितले.
7 / 11
भारताचा एकही युवा खेळाडू दीर्घकाळ चमकू शकलेला नाही याचे कारण विचारले असता सानियाने सांगितले की, याची कारणे अनेक आहेत. काही कारणांवर उपाय शोधले जाऊ शकतात.
8 / 11
तसेच काही कारणे असे देखील असतात ज्यांच्यावर उपाय शोधणे कठीण असते. आपल्या इथे पुरेशा सुविधा नाहीत. सुमित नागल बराच काळ युरोपमध्ये खेळत आहे. खेळाडूंना खेळण्यासाठी इतर देशात जावे लागते, त्यामुळे आपल्या देशातच त्यांच्यासाठी सर्व सुविधा असायला हव्यात, असेही सानियाने सांगितले.
9 / 11
इतर देशांच्या तुलनेत भारतातील व्यवस्था वाईट नाही, फक्त काही गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात. उदाहरणार्थ, बॅडमिंटनमध्ये गोपीचंद अकादमी फेडरेशनशी जवळून काम करते. रोहन बोपण्णा आणि इतर अनेकजण आपापल्या स्तरावर अकादमी चालवतात. मला वाटते की, बॅडमिंटनची गोष्ट टेनिसमध्ये देखील व्हायला हवी आणि सर्व जबाबदार लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे सानियाने आणखी सांगितले.
10 / 11
सानिया मिर्झा म्हणते, 'मी आता याबाबत काहीच बोलू शकत नाही. ही खूप दूरची बाब आहे. मागील दहा वर्ष मी माझी अकादमी चालवत आहे आणि अनेक खेळाडू माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. मी एक-दोन खेळाडूंना वैयक्तिकरीत्या मदत करू शकते, पण यंत्रणा चांगली असेल तर अनेक खेळाडूंना त्यातून मदत मिळते. चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये अशा प्रणाली आहेत, ज्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडू तेथे उदयास येतात.
11 / 11
सानिया मिर्झा म्हणते, 'मी आता याबाबत काहीच बोलू शकत नाही. ही खूप दूरची बाब आहे. मागील दहा वर्ष मी माझी अकादमी चालवत आहे आणि अनेक खेळाडू माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. मी एक-दोन खेळाडूंना वैयक्तिकरीत्या मदत करू शकते, पण यंत्रणा चांगली असेल तर अनेक खेळाडूंना त्यातून मदत मिळते. चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये अशा प्रणाली आहेत, ज्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडू तेथे उदयास येतात.
टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिसIndiaभारत