ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 21 - कोलकाता नाइट रायडर्सनं दिलेलं 188 धावांचं लक्ष्य पार करत गुजरातनं 4 गडी राखून विजय साजरा केला आहे. रैना आणि जडेजाच्या 58 धावांच्या भागीदारीमुळे गुजरातचा विजय सुनिश्चित झाला. कर्णधार सुरेश रैनानं दमदार फलंदाजीच्या जोरावर 46 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 84 धावा केल्या आहेत. तर फिंच (31) आणि मॅकक्युलम (33) धावा काढून तंबूत परतले आहेत. एकंदरीतच गुजरात लायन्सनं शानदार फलंदाजीचा नजराणा पेश केला आहे. तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने तुफान आक्रमण करत गुजरात लायन्सविरुद्ध 10 षटकात 1 बाद 96 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर सुनील नरेनने केवळ 17 चेंडूत 42 धावांचा तडाखा देत गुजरातची गोलंदाजी फोडून काढली होती. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर नाणेफेक जिंकून कर्णधार गौतम गंभीरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.पॉइंट्स टेबल गेल्या सामन्यात सुनील नरेनला सलामीला पाठविण्याची रणनीती यशस्वी ठरल्यानंतर पुन्हा एकदा गंभीरने तीच चाल केली होती. नरेनने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना गुजरातच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. मात्र तरीही कोलकात्याला पराभव पत्करावा लागला आहे. प्रवीण कुमार, जेम्स फॉल्कनर, बसिल थम्पी यांंचा नरेनने चांगलाच समाचार घेत चेंडू सीमापार धाडण्याचा धडाका लावला होता.