How much is Manu Bhakar's pistol worth 2 medals in Olympics? How do you get it?
Paris Olympics 2024 मध्ये भारताला २ मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते? By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 8:02 PM1 / 7Manu Bhaker Pistol Price: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकवताना दिसत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हरयाणाची कन्या नेमबाज मनू भाकर. मनू भाकरने आतापर्यंत यंदाच्या Paris Olympics 2024 स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली आहेत.2 / 7मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर सरबजोत सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.3 / 7आता साऱ्यांच्या नजरा मनू भाकरच्या पदकांची हॅट्ट्रिक साधण्यावर आहेत. महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत मनूने धडक मारली आहे. मनू भाकर ज्या पिस्तुलाच्या जोरावर हे यश मिळवत आहे, त्याबाबत जाणून घेऊया.4 / 7मनू भाकर ज्या पिस्तुलाने सातत्याने पदक जिंकत आहे, ते मोरीनी कंपनीचे आहे. ती MORINI कंपनीच्या CM 162EI सोबत नेमबाजी करत आहे. सरकारच्या परवानगीशिवाय भारतीय नेमबाजांना हे पिस्तूल मिळत नाही. तसेच सरकारच्या मान्यतेशिवाय कोणीही याची विक्रीही करू शकत नाही.5 / 7मनू कडे असलेले पिस्तूल हे योग्य परवाना असल्यासच मिळते. जर कोणताही भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असेल तर, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडून त्या स्पर्धकाला ही बंदूक दिली जाते.6 / 7१० मीटर एअर पिस्तूलमध्ये वापरलेले पिस्तूल ४.५ मिमी कॅलिबर आणि सिंगल लोडेड असते. या स्पर्धेसाठी बहुतेक नेमबाज हे मोरीनी कंपनीचे CM 162EI मॉडेल पिस्तूलच वापरतात.7 / 7Morini CM 162EI मॉडेलच्या पिस्तुलाची किंमत अंदाजे १,६६,९०० रुपये इतकी आहे. पिस्तुलाच्या मॉडेलवर त्याची किंमत कमी किंवा जास्त असू शकते. हे पिस्तूल खरेदी करण्यासाठी बरीच कागदपत्रे द्यावी लागतात. आणखी वाचा Subscribe to Notifications