शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अभिमानास्पद! आईसमोर देशासाठी जिंकलं 'सुवर्ण', 'गोल्डन गर्ल' म्हणतायत, ही फक्त सुरूवात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 2:13 PM

1 / 11
भारतीय खेळाडूंनी नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (Women's World Boxing Championship) चार सुवर्ण पदके जिंकली आहेत. निखत झरीन व्यतिरिक्त, ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन, नीतू घनघास आणि स्वीटी बुरा यांनीही गोल्डन पंच मारून तिरंग्याची शान वाढवली आहे.
2 / 11
सोनेरी यश मिळवल्यानंतर या चार सुवर्ण मुलींनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले.
3 / 11
लव्हलिना आणि निखत यांनी स्वतःवर बायोपिक बनवण्याबाबत म्हटले की, आता फक्त सुरूवात झाली आहे. बायोपिकसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
4 / 11
निखत झरीनने 2022 मध्ये जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वप्रथम सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर यंदा देखील तिने आपली सोनेरी0 कामगिरी कायम ठेवली आहे.
5 / 11
खरं तर या स्पर्धेतील निखतचे हे दुसरे विजेतेपद आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन विजेतेपदे पटकावणारी निखत ही दुसरी भारतीय महिला बॅक्सर ठरली आहे.
6 / 11
निखतने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 50 किलो वजनी गटात ही किमया साधून तिरंग्याची शान वाढवली. भारताच्या निखतने या वजनी गटात व्हिएतनामच्या एनगुएन थि ताम हिला 5-0 असे नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
7 / 11
निखतच्या वडिलांना आपल्या मुलीला धावपटू बनवायचे होते, पण निखतने आपल्या वडिलांची चूक सिद्ध करण्यासाठी बॉक्सिंगमध्ये झेंडा फडकवण्याचा इरादा केला. इंडिया टुडेशी संवाद साधताना निखतने या विजयाबद्दल सांगितले की, 'जेव्हा पंचांनी माझा हात वर केला आणि मला विजेता घोषित केले. त्यावेळी मला अधिक आनंद झाला कारण पहिल्यांदाच माझी आई स्टेडियममध्ये बसून मला विजयी होताना पाहत होती. म्हणूनच माझ्या आईसमोर पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकणे माझ्यासाठी खूप खास आहे.'
8 / 11
तर पहिल्यांदाच जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 81 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलेल्या स्वीटीने म्हटले, '9 वर्षांपूर्वी मी रौप्य पदक जिंकले होते आणि आता सुवर्ण जिंकल्यावर खूप आनंद झाला आहे. माझे आई-वडील आणि कुटुंबीय मला चॅम्पियन म्हणायचे पण मला ते सिद्ध करायचे होते. आता हे सिद्ध झाले असून ही भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.'
9 / 11
नीतू घनघासने देखील प्रथमच सुवर्ण पदक जिंकले. मी प्रथमच फायनल खेळले त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढला असल्याचे नीतूने सांगितले.
10 / 11
दरम्यान, या सर्व गोल्डन गर्लंना त्यांच्या बायोपिकबद्दल विचारण्यात आले तेव्हा लव्हलिना आणि निखत या दोघींनी सांगितले की, बायोपिकसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल कारण आमची नुकतीच सुरूवात झाली आहे.
11 / 11
लव्हलिनाने आपल्या विजयावर सांगितले, 'मी पहिली दोन कांस्यपदके जिंकली होती, त्यामुळे विजयानंतर तिरंगा फडकावण्याची अनुभूती मला नेहमीच मिळावी असे वाटत होते. जे आता पूर्ण झाले आहे.'
टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारतGold medalसुवर्ण पदकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी