Indian sports journalist Jatin Sapru had asked Neeraj Chopra about his hairstyle in a program.
'तुझ्या हेअरस्टाईलचं रहस्य काय? शाहरुख की ईशांत?'; सुवर्ण पदक विजेता नीरज म्हणतो... By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 6:06 PM1 / 8 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या अखेरच्या स्पर्धेत नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. भालाफेकीत ८७.५८ मीटर लांब अंतर पार करून नीरजनं ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स स्पर्धेतील देशाचा १२५ वर्षांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला अन् बक्षीसांचा पाऊसही पडला. 2 / 8 २३ वर्षांच्या या भालाफेक पटूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक काय जिंकले धडाधड बक्षीसांची लयलूट त्याच्यावर होऊ लागली. आजवरच्या या बक्षीसांचा आकडा हा १६ कोटींहून अधिक झाला आहे. त्याचा हा पराक्रम सर्व जगाने पाहिला. परंतू त्याचे खासगी आयुष्य ते ही मैदाना बाहेर कसे आहे यामध्ये लोकांची रुची वाढू लागली आहे.3 / 8हरियाणाच्या पानिपत भागातील एका छोट्या गावात राहणारा नीरज आज देशवासीयांचा लाडका बनला आहे. सोशल मीडियावरही फक्त नीरजचीच चर्चा आहे. नीरजने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याच्या बायोपिकबद्दलची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच नीरजचे काही जुने व्हिडिओ या दरम्यान व्हायरल होऊ लागले आहेत. 4 / 8भारतीय क्रीडा पत्रकार जतीन सप्रू यांनी एका कार्यक्रमात नीरजला हेअर स्टाईलबाबत एक प्रश्न विचारला होता. यामध्ये जतीन सप्रु यांनी तुझ्या हेअर स्टाईलमागचा आयकॉन किंवा inspiration कोण आहे? बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान कि भारताचा वेगवान गोलंदाजड इशांत शर्मा?, असा प्रश्न विचारला होता. 5 / 8जतीन सप्रू यांच्या या प्रश्नावर, कुणी नाही. मी स्वत: आहे, असं मजेशीर उत्तर नीरजने दिलं.6 / 8 दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकून नीरज परतला, तेव्हा त्याचे लांब केस त्याची खास ओळख बनले होते. मात्र टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने केस कापण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्याला विचारले असता, मला लांब केस आवडतात. 7 / 8मात्र स्पर्धेसाठी सराव करताना आपल्याला मोठ्या केसांमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे खेळाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना आपल्याला केस कापण्याचा सल्ला दिला. या कारणासाठी आपण केस कापल्याचं नीरजने सांगितलं.8 / 8आता ऑलिम्पिक संपलं असल्यामुळे आपण केस पुन्हा वाढवणार असल्याचंही नीरजने सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications