By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:32 IST
1 / 10भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा मंगळवारी डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पहिल्याच सामन्यात आपली सहकारी अमेरिकेची मॅडिसन कीजच्यासोबतीने सरळ सेटमध्ये पराभूत होताच सानियाच्या शानदार कारकिर्दीचा अंत झाला.2 / 10रशियाची जोडी व्हेरोनिका- ल्यूडमिला सॅमसोनोवा यांनी एक तास चाललेल्या लढतीत सानिया- मॅडिसन यांच्यावर 6-4, 6-0 ने विजय साजरा केला.3 / 10व्हेरोनिका एकेरीत 11 व्या तर दुहेरीत पाचव्या स्थानावर आहे. ल्यूडमिला दुहेरीत 13 व्या स्थानी आहे. 36 वर्षांची सानिया 2003 मध्ये व्यावसायिक खेळाडू बनली. तिने कारकीर्दीत सहा ग्रॅन्डस्लॅम जिंकले असून त्यात तीन महिला दुहेरी आणि तीन मिश्र दुहेरीचा समावेश आहे. 4 / 10सानियाने महिला दुहेरीत तिन्ही ग्रॅन्डस्लॅम मार्टिना हिंगिससोबत जिंकले आहेत. 5 / 10मिश्र गटातील दोन ग्रॅन्डस्लॅम महेश भूपतीसोबत (2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 मध्ये फ्रेंच ओपन) जिंकले होते. याशिवाय ब्रुनो सोरेसच्या सोबतीने सानियाने अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकाविले होते.6 / 10दरम्यान, आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळल्यानंतर सानिया मिर्झा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. टेनिस या खेळाला माझ्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच हा खेळ माझे सर्वस्व नसल्याचे देखील तिने यावेळी स्पष्ट केले.7 / 10आंतरराष्ट्रीय टेनिस खेळात नावलौकिक मिळवणारी हैदराबादी सानिया भारतीय टेनिसचा प्रमुख चेहरा आहे. तिने अलीकडेच निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे दुबई ही स्पर्धा तिच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा ठरली आहे.8 / 10अखेरच्या सामन्यानंतर सानियाने म्हटले, 'मी कधीच पराभवाच्या भीतीसह टेनिस कोर्टावर पाऊल ठेवले नाही. फार तर फार काय होईल, माझा पराभव होईल. हार-जीत सुरूच राहते. पुन्हा पुढच्या आठवड्यात नव्या स्पर्धेसाठी चांगल्या तयारीनिशी सज्ज व्हायचे. क्रीडाक्षेत्रातील कोणत्याही अव्वल खेळाडूला पराभवाची भीती नसते.'9 / 10नेमके 2008च्या ऑलिम्पिकदरम्यान माझे मनगट दुखावले होते. तो काळ अतिशय नैराश्याचा असल्याचे सानियाने म्हटले. तसेच ही दुखापत मानसिकतेवर घाव घालणारी असल्याचेही तिने यावेळी सांगितले.10 / 10'चार ऑलिम्पिकमध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व केले, हे मोठेच यश आहे, कारकिर्दीतील एखादा प्रसंग बदलण्याची संधी मिळाली, तर 2016 च्या ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाची लढत किंवा त्याआधीच्या लढती मला बदलायला आवडतील', असे सानियाने अधिक सांगितले.