India's Six Beautiful Sportswoman
भारताच्या सहा ब्युटीफूल स्पोर्ट्सवुमन By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 1:04 PM1 / 6जलतरणपटू शिखा टंडनच्या नावावर 146 राष्ट्रीय आणि 36 आंतरराष्ट्रीय पदकं जमा आहेत. बंगळूरुच्या या खेळाडूने 13व्या वर्षी आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने 50 व 100 मीटर फ्रीस्टाईल गटात सहभाग घेतला होता. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन विविध प्रकारात पात्र ठरलेली ती पहिलीच भारतीय खेळाडू होती.2 / 6सानिया मिर्झा... आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये मानाने घेतले जाणारे नाव. सहा ग्रँडस्लॅम जेतेपद तिच्या नावावर आहेत. त्याशिवाय आशियाई, राष्ट्रकुल आणि अॅफ्रो-एशिया स्पर्धेत तिने 14 पदके जिंकली आहेत आणि त्यात सहा सुवर्णपदकांचा समावेश आहे.3 / 6भारताची स्क्वॉश क्वीन अशी दीपिका पल्लीकलची ओळख आहे. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रत्येकी तीन पदके तिच्या नावावर आहेत.4 / 6उत्तर प्रदेशच्या आकांक्षा सिंग या बास्केटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत.5 / 6सतत वादात अडकलेली ज्वाला गट्टा ही भारताची सर्वात यशस्वी दुहेरीतील बॅडमिंटनपटू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्या नावावर पदके आहेत.6 / 6बास्केटबॉल खेळाडू प्राची तेहलानच्या खेळाप्रमाणे सौंदर्याचीही अधिक चर्चा रंगते. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने 2011च्या दक्षिण आशिया समुद्रचौपाटी स्पर्धेत प्रथमच पदक जिंकण्याचा पराक्रम केला. आणखी वाचा Subscribe to Notifications