- आकाश नेवे, ऑनलाइन लोकमतकॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनी सध्या फॉर्र्मच्या बाहेर आहे. त्याच्या खेळीला बहार यावा, हीच त्याच्या तमाम फॅन्सची इच्छा असेल. आणि गरजेच्या वेळी तो आपल्या संघासाठी उपयुक्त खेळीदेखील करतो. आता अशीच गरज धोनीच्या पुणे सुपर जायंट्स संघाला आहे. पुण्याचा संघ गुणतक्त्यात आठव्या स्थानावर आहे. स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पुणे संघाला गरज आहे ती आजच्या सामन्यात विजय मिळवण्याची. आज थोड्याच वेळात रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध बलाढ्य सनरायजर्स हैदराबाद असा सामना आहे.आयपीएलच्या या सत्रात पुण्याची फलंदाजी रहाणे आणि स्मिथ यांच्या बाहेर फार गेली नाही. २८ ही या स्पर्र्धेतील धोनीची सर्र्वाधिक धावसंख्या आहे. राहुल त्रिपाठी आणि बेन स्टोंक्स यांनी धावा केल्या. मात्र त्या नेहमीच अपुऱ्या पडल्या. पुण्याच्या गोलंदाजीतही धार नाही. अशोक दिंडा या सत्रात महागडा गोलंदाज ठरला. त्यासोबतच बेन स्टोंक्सला फारशी चमक दाखवता आली नाही. नाही म्हणायला इम्रान ताहीरने आतापर्यंच चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना अडचणीत आणले आहे. पण त्याला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही. शार्दुल ठाकूरला चमकदार कामगिरी करावी लागेल.या उलट स्थिती सनरायजर्स संघ मजबूत आहे. डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, युवराज सिंह अशा फॉर्ममध्ये असलेल्या तगड्या फलंदाजांची फौज हैदराबादकडे आहे. शिखर आणि वॉर्नर हे नेहमीच संघाला चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरतात.दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत स्पर्धेत २०० च्या वर धावा केल्या आहेत. त्यासोबतच भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी प्रतिस्पर्ध्यांना नमोहरम करते. त्याने आतापर्यंत १५ गडी घेतले असून त्याच्याकडे पर्पल कॅपही आहे. त्याच्या जोडीला अफगाणिस्तानचा युवा प्रतिभावान राशिद खान आहे. त्यानेदेखील आतापर्यंत नऊ बळी घेतले आहेत.