ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - आयपीएलमध्ये चिअरलिडर्स एक महत्त्वाचा भाग झाल्या आहेत. प्रत्येक सामन्यात चौकार- षटकारानंतर डान्स करणाऱ्या चिअरलिडर्स तुम्ही पाहत असाल. चिअरलिडर्सला पाहिल्यानंतर त्यांना किती पैसे मिळत असतील याचा विचारही तुम्ही केला असेल. त्यांचा पगार वाचून तुम्ही हैराण व्हाल. माध्यमांच्या वृत्तानुसार प्रत्येक मॅचला त्यांना 15 ते 25 हजार रुपये मिळतात. तसेच संघाने सामना जिंकल्यास त्यांना बोनसही दिला जातो. आयपीएलमध्ये आठ टीम खेळतात आणि प्रत्येक टीम आपल्या हिशोबाने त्यांना पगार देत असते. पण यांना कमीतकमी 6000 रुपये प्रतिमॅच मिळतातच. या व्यतिरिक्त मॅच जिंकल्यावर 3000 रुपये बोनस म्हणून दिले जातात. तसेच पार्टी आणि इतर कामासांठी 7000 ते 12000 रुपयेदेखील मिळतात. अशाप्रकारे एका सिजनला त्यांची कमाई चार लाख रूपये होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ही चिअरलिडर्सना सर्वात जास्त सॅलरी देणारी टीममध्ये आहे. आरसीबी आपल्या चिअरलिडर्सना प्रतिमॅच 6000 ते 12 000 रुपये देते. तसेच आरसीबी मॅच जिंकली तर बोनस म्हणून 3000 रुपये देते. तसेच एक्स्ट्रा काम आणि पार्टीजसाठी 7000-12000 रुपये मिळतात. फोटोशूटसाठी 5000 रुपये. - आयपीएलच्या नवव्या मोसमात केकेआरने चिअरलिडर्सच्या मानधनात 10 टक्केने वाढ केली होती. केकेआरच्या चिअरलीडर्सना प्रतिमॅच 12000 रुपये मिळतात. तसेच टीम जिंकल्यावर 3000 रुपयांचा बोनस दिला जातो. तसेच एक्स्ट्रा काम जसे की पार्टी आणि फोटोशुटसाठी त्यांना 12000 रुपये दिले जातात. मुंबई इंडियन्स आणि बाकीच्या टीम चीअरलिडर्सना प्रतिमॅच 7000 ते 8000 रुपये देतात. तसेच बोनस म्हणून 3000 रुपये देतात. पार्टी आणि इतर कार्यक्रमांसाठीचा पगार त्यांच्या प्रत्येक मॅचच्या पगारावरुन ठरत असतो.