1 / 7कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या व्हायरसवर मात करण्यासाठी अनेक डॉक्टर औषधांचा शोध लावत आहेत. त्यांना यश येईल अशी सर्वच प्रार्थना करत आहेत. पण, या कोरोना व्हायरसमुळे जगातील दिग्गज खेळाडूला हतबल केलं आहे.2 / 7मिक्स मार्शल आर्ट्सचा युनायटेड फायटींग चॅम्पियन ( UFC) खबीब मुरामगोमेदोव्ह याच्यावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. 3 / 7रुसमध्ये राहणाऱ्या त्याच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे. एबडुलनाप हे त्याचे केवळ वडीलच नव्हे तर प्रशिक्षकही आहे आणि ते सध्या आयसीयूत आहेत.4 / 7कोरोनामुळे प्रकृती बिघडल्यामुळे एबडुलनाप यांच्यावर हार्ट सर्जरी करण्यात आली. रुसमध्ये आतापर्यंत तीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे.5 / 7खबीबच्या कुटुंबातील 20 हून अधिक सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तो म्हणाला,''माझे वडिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती सुधरावी.''6 / 7खबीबच्या कुटुंबातील 20 हून अधिक सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तो म्हणाला,''माझे वडिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती सुधरावी.''7 / 7 खबीब हा UFCच्या लाईटव्हेट गटातील विजेता आहे. त्याला इतिहासातील सर्वात खतरनाक फायटर मानले जाते. त्यानं आतापर्यंत 27 लढतीत एकही गमावली नाही. खबीबनं दिग्गज फायटर कॉरनला हरवले होते.