शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lionel Messi Bisht Black Robe story: लिओनेल मेस्सीने FIFA World Cup उचलला तेव्हा अंगावर काळा 'बिश्त' कोट का घातला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 1:11 PM

1 / 6
Lionel Messi bisht black robe story at Fifa World Cup 2022 Final: अतिशय अटीतटीच्या झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कप फायनलमध्ये अखेर लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा विजय झाला. सामना सुरूवातीच्या निर्धारित वेळेत २-२ अशा बरोबरीत आणि अतिरिक्त वेळेत प्रत्येकी १ गोल करत ३-३ अशा बरोबरी होता. पण मोक्याच्या क्षणी पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ असा फरक राखत अर्जेंटिनाने कायलिन एम्बाप्पेच्या फ्रान्सचा पराभव केला.
2 / 6
अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने याआधी १९७८ आणि १९८६ मध्ये चमकदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकली होती. अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवण्यासाठी ३६ वर्षे वाट पाहावी लागली.
3 / 6
लिओनेल मेस्सीने जेव्हा ट्रॉफी उचलली तेव्हा एक काळा अरबी पद्धतीचा ड्रेस (bisht black robe) परिधान केला होता. त्या ओव्हरकोटने त्याची निळी-पांढरी अर्जेंटिनाची जर्सी पूर्णपणे झाकून गेली. काही चाहत्यांना हे रूचलं नाही. पण हा काळा कोट घालण्यामागे एक मोठं कारण आहे, ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
4 / 6
लिओनेल मेस्सीचा विश्वचषक प्रवास २००६ मध्ये सुरू झाला आणि आता तो पहिला विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झाला. या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो लिओनेल मेस्सीच. मेस्सीने अंतिम फेरीत दोन महत्त्वाचे गोल केले आणि पेनल्टी शूटआऊटमध्येही गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
5 / 6
लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा फिफा विश्वचषक असल्याचे बोलले जात आहे. पण त्याने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, तो निवृत्त होईपर्यंत अर्जेंटिनाकडून खेळत राहणार आहे. असे असताना मेस्सीची अर्जेंटिनाची जर्सी झाकणारा बिश्त कोट त्याच्या अंगावर का घातला गेला, याचं खास कारण जाणून घेऊया.
6 / 6
वास्तविक, हा काळा ड्रेस कतारच्या अमीर तमीम बिन हमाद अल थानीने लिओनेल मेस्सीला ट्रॉफी सुपूर्द करण्यापूर्वी प्रदान करत घातला होता. याला बिश्त (Bisht) म्हणतात. हा उंटाचे केस आणि बकरीच्या लोकरीपासून बनवलेला पोशाख आहे जो अरब देशांमध्ये विशेष प्रसंगी परिधान केला जातो. हे राजेशाही किंवा धार्मिक नेत्यांनी परिधान केलेले वस्त्र आहे. मेस्सीने जेव्हा ट्रॉफी उचलली तेव्हा तो गौरवास्पद क्षण असल्याने तो कोट त्याने परिधान केला होता.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Lionel Messiलिओनेल मेस्सीQatarकतारSocial Mediaसोशल मीडिया