Maana Patel becomes 1st female and 3rd Indian swimmer to qualify for Tokyo 2020
Tokyo Olympic 2020 : गुजरातच्या माना पटेलनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट; टोक्योत खेळणारी भारताची पहिली महिला जलतरणपटू! By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 6:06 PM1 / 8गुजरातच्या २१वर्षीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू माना पटेलनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारी ती गुजरातची पहिलीच खेळाडू आहे.2 / 8अहमदाबाद येथे राहणारी माना पटेल टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभाग घेणार आहे. या प्रकारात सहभाग घेणारी ती भारताची पहिलीच महिला जलतरणपटू आहे. 3 / 8यापूर्वीही मानानं अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे आणि सुवर्णपदकही जिंकले आहे. पण, ती प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहे.4 / 8universality कोट्यातून तिला हे ऑलिम्पिक तिकीट मिळालं आहे. या निवडीबद्दल मानानं आनंद व्यक्त केला आहे. तिच्या पदकाच्या कपाटात ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई पदकांची भर पडावी अशी तिची इच्छा आहे.5 / 8माना दिवसाला पाच तास सराव करते. सकाळी दोन तास, दुपारी एक तास आणि संध्याकाळी दोन तास असे तिचे सराव सत्र असते. याशिवाय ती एक तास जिममध्येही व्यायाम करते. ती मानसिक तंदुरुस्तीवरही भर देते. माना पटेल ही पूर्णपणे शाकाहारी आहे. 6 / 8माना दिवसाला पाच तास सराव करते. सकाळी दोन तास, दुपारी एक तास आणि संध्याकाळी दोन तास असे तिचे सराव सत्र असते. याशिवाय ती एक तास जिममध्येही व्यायाम करते. ती मानसिक तंदुरुस्तीवरही भर देते. माना पटेल ही पूर्णपणे शाकाहारी आहे. 7 / 8माना दिवसाला पाच तास सराव करते. सकाळी दोन तास, दुपारी एक तास आणि संध्याकाळी दोन तास असे तिचे सराव सत्र असते. याशिवाय ती एक तास जिममध्येही व्यायाम करते. ती मानसिक तंदुरुस्तीवरही भर देते. माना पटेल ही पूर्णपणे शाकाहारी आहे. 8 / 8माना दिवसाला पाच तास सराव करते. सकाळी दोन तास, दुपारी एक तास आणि संध्याकाळी दोन तास असे तिचे सराव सत्र असते. याशिवाय ती एक तास जिममध्येही व्यायाम करते. ती मानसिक तंदुरुस्तीवरही भर देते. माना पटेल ही पूर्णपणे शाकाहारी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications