mma fighter brendan loughnane won the pfl featherweight championship get 8 crore cried after winning
15 हजारांसाठी चेहऱ्यावर झेलले घाव, आता एका मॅचने बनवले करोडपती! By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 7:42 PM1 / 5कोणत्याही खेळात विजय हा खूप मोठा असतो, कारण विजय कधी कधी आयुष्य बदलून टाकतो. विशेषतः जेव्हा खूप संघर्षानंतर विजय मिळतो. जेव्हा खेळाडू मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये जिंकला, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. विजयानंतर हा खेळाडू खूप भावूक झाला. ब्रेंडन लॉघेन असे या खेळाडूचे नाव आहे.2 / 5मँचेस्टरच्या ब्रेंडन लॉघेनने नुकतेच 2022 पीएफएल फेदरवेट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याने बुबा जेनकिन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयानंतर तो खूप भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.3 / 5गेल्या महिन्यात जिंकलेल्या या विजेतेपदासह ब्रेंडन लॉघेनला आठ कोटींहून अधिक बक्षीस मिळाले. त्यांच्यासाठी ही किंमत खूप मोठी आहे. एक काळ असा होता जेव्हा तो फक्त 15,000 रुपयांसाठी लढत असे आणि आज तो आपले शहर मँचेस्टरपासून एमएमए चॅम्पियन बनलेला पहिला खेळाडू आहे.4 / 52008 मध्ये ब्रेंडन लॉघेनला एका मारामारीसाठी 15 हजार रुपये मिळत होते. तेथून ब्रेंडन लॉघेनने फेदरवेट चॅम्पियनशिपपर्यंतचा प्रवास केला. त्याने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.5 / 5या विजेतेपदानंतर ब्रेंडन लॉघेन आता कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. डेली स्टार स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला की पैसे येतील आणि जातील पण एमएमए चॅम्पियन बनणारा मँचेस्टरचा तो पहिला खेळाडू आहे, याचा त्याला सर्वात जास्त आनंद आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications