७ महिने गरोदर तरी ऑल्मिपिकमध्ये दमदार कामगिरी; इजिप्तची फेंसर नादा हाफेज चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:34 IST
1 / 7कल्पना करा की सात महिन्यांची गरोदर असूनही कोणती महिला ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकते का? इजिप्तच्या नादा हाफेझने ही कामगिरी केली आहे.2 / 7सात महिन्यांची गरोदर असूनही ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी करणे इजिप्तचा तलवारबाज नादा हाफेझसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही.3 / 7ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान गर्भवती असूनही नादा हाफेझने स्पर्धेत भाग घेतला आणि काही सामने जिंकण्यातही यश मिळविले.4 / 7स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर २६ वर्षीय नाफाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तलवारबाजीबद्दलची आवड आणि समर्पणाबद्दल खूप प्रशंसा होत आहे.5 / 7माझ्या पोटात एक छोटासा भविष्यातील ऑलिम्पियन वाढत आहे. स्पर्धेत, माझा मुलगा आणि मी आमच्या संबंधित आव्हानांमध्ये भाग घेतला. भले ते शारीरिक असो वा भावनिक, असे नाफाने म्हटलं आहे.6 / 7“गर्भधारणा हा खूप कठीण मार्ग आहे. जीवन आणि खेळ यांच्यात समतोल राखणे हे खूप आव्हानात्मक काम होते. माझा पती इब्राहिम इहाब आणि माझ्या कुटुंबाच्या विश्वासाने मला इथपर्यंत पोहोचता आले हे माझे भाग्य आहे. हे खास ऑलिम्पिक वेगळे होते,' असेही नाफा म्हणाली.7 / 7हाफेझने स्पर्धेदरम्यान अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीचा १५-१३ अशा फरकाने पराभव केला होता. मात्र, पुढच्या सामन्यात तिला दक्षिण कोरियाच्या जिओन हयांगविरुद्ध पराभव पत्करावा लागला.