रिकॉर्ड तोड कमाई: कोरोनामुळे लोकांचे खायचे वांदे अन् टेनिसपटूनं १२ महिन्यात कमावले ४०२ कोटी! By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:20 PM
1 / 10 जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाका ( Naomi Osaka) कमाईच्या बाबतीत सर्व रिकॉर्ड मोडून इतिहास रचला. 2 / 10 मागील १२ महिन्यांत तिने ५० मिलियन डॉलर ( जवळपास ४ अरब रुपये) ची कमाई केली. 3 / 10 ओसाकानं ही कमाई टेनिस कोर्टच्या बाहेर केली आहे आणि ती आता सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू बनली आहे. 4 / 10 नाओमीनं २०२०च्या अमेरिकन ओपन आणि २०२१च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिच्या नावावर एकूण ४ ग्रँड स्लॅम आहेत. 5 / 10 तिनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात पेट्रा क्वितोव्होवर, तर अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये व्हिक्टोरिया अझारेंकावर विजय मिळवला. नाओमी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 6 / 10 नाओमी ओसाकाचा खेळ पाहून अनेक कंपन्या प्रभावित झाल्या आणि मोठी रक्कम देऊन तिच्याशी करार केला. नाओमीनं दोन डझन कंपनींसोबत करार केला आहे. यामध्ये Tag Heuer, Nike, Citizen Watch, Nissan यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 7 / 10 मागील १२ महिन्यांत तिनं ५५.२ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ४०२ कोटी भारतीय रक्कम एवढी कमाई केली. कोणत्याही महिला खेळाडूची ही आत्तापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. 8 / 10 नाओमीनं यातील ५.२ मिलियन हे स्पर्धेतून जिंकले आहेत आणि उर्वरित कमाई ही कोर्ट बाहेरील आहे. 9 / 10 नाओमीची मोठी बहीण मेरी ओसाका ही पण व्यावसायिक टेनिसपटू आहे. सेरेना व व्हिनस या विल्यम्स भगिनींना पाहून या दोघींनी टेनिस खेळण्यास सुरूवात केली. 10 / 10 नाओमीनं नुकतीच एक घोषणा केली की ती फ्रेंच ओपन स्पर्धेदरम्यान तेथील मीडियाशी बोलणार नाही. ती म्हणाली,''लोकांमध्ये खेळाडूंचे मानसिक आरोग्याप्रती काहीच सन्मान नाही आणि हे खरं आहे. पत्रकार कोणतेही प्रश्न विचारतात आणि त्यामुळे आमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे यावेळी मी तेथील मीडियाशी संवाद साधणार नाही.'' आणखी वाचा