Neeraj Chopra: Do you have a girlfriend? When are you getting married, Kapil Dev asked
Neeraj Chopra: तुला गर्लफ्रेंड आहे का? लग्न कधी करतोयस? कपिल देवनी नीरज चोप्राला विचारला प्रश्न, अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 1:30 PM1 / 10नवी दिल्ली : नीरज चोप्राला (Neeraj Chopra) आज कोण ओळखत नाही? ज्याच्या त्याच्या फोनमध्ये, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टावर गेले दोन दिवस त्याचाच फोटो होता. (Neeraj Chopra has girlfriend? when will he marry? Kapil dev Ask him some question about Private life)2 / 1023 वर्षांच्या या भालाफेक पटूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक काय जिंकले धडाधड बक्षीसांची लयलूट त्याच्यावर होऊ लागली. आजवरच्या या बक्षीसांचा आकडा हा 16 कोटींहून अधिक झाला आहे. (Neeraj Chopra has girlfriend? Kapil dev ask him.)3 / 10त्याचा हा पराक्रम सर्व जगाने पाहिला. परंतू त्याचे खासगी आयुष्य ते ही मैदाना बाहेर कसे आहे यामध्ये लोकांची रुची वाढू लागली आहे. 4 / 10महान क्रिकेटर कपिल देव यांनी एका कार्यक्रमात नीरज चोप्राला त्याच्या खासगी आयुष्यावर प्रश्न विचारला आहे. यावर नीरज लाजला. 5 / 10एबीपी न्यूजवर झालेल्या या चर्चेत कपिल देव (Kapil dev) य़ांनी त्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारले. या प्रश्नावर नीरजचा चेहरा खुलला. त्याने सांगितले, सध्या त्याचे लक्ष खेळावर आहे. 6 / 10कविल देव म्हणाले की, तुझे पालक सांगतायत की तू आणखी दोन वेळा सुवर्ण पदक घेऊन येशील. म्हणजे पुढचे 7-8 वर्षे आणखी लागतील. तुझे लग्न लावून द्यायचा त्यांचा विचार दिसत नाहीय. तुला हे मान्य आहे का? 7 / 10नीरज चोप्राने यावर लाजत उत्तर दिले, मला माहिती नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते देखील होईल. सध्या मन आणि ध्यान खेळावरच आहे. पुढ जे होईल बघू. 8 / 10यावर कपिल देव यांनी विचारले की, असे तर नाहीय तुझी गर्लफ्रेंड आहे? किंवा आई-वडिलांवर सोडलेयस. ते सांगतील त्याच मुलीशी लग्न करणार?9 / 10यावर नीरजने हसत उत्तर दिले. मी सध्या खेळावर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या काळात काहीही होऊ शकते. आई-वडिलांना चांगले वाटले ते देखील ठीक आहे. मला एखादी आवडली तर मी त्यांच्याशी बोलेन. जर ते तयार झाले तर... काहीही होऊ शकते, असे तो म्हणाला. 10 / 10कपिलने जेव्हा नीरजला शुभेच्छा दिल्या तेव्हा नीरजने त्यालाही रिप्लाय दिला. तुमच्यासारख्या मोठ्या खेळाडूंना पाहूनच आम्ही शिकलो आहोत. आता आम्ही चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण पुढील पिढी त्यापेक्षा जास्त चांगले करू शकेल. आणखी वाचा Subscribe to Notifications