Neeraj Chopra gets 16.75 crore cash within 3 hours of winning gold in Tokyo Olympics; know full list
Neeraj Chopra : गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 4:29 PM1 / 9Tokyo Olympics 2020, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. नीरजनं ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. 2 / 9नीरजच्या या अविश्वसनीय कामगिरीनंतर १३ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे राष्ट्रगीत ऐकू आले. यावेळी तमाम भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. या विजयानंतर नीरज चोप्रावर बक्षीसांचा धो धो पाऊस पडला, ३ तासांच्या आत त्याच्यासाठी जवळपास १६.७५ कोटी रुपयांच्या बक्षीसांची घोषणा झाली.3 / 9''जेतेपदाचा आनंद अन् तो क्षण आजही ताजा आहे. सर्व भारतीयांचे आभार, तुमचा आशीर्वाद अन् पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं. हा क्षण आयुष्यात कायम लक्षात राहील,''असे नीरजनं रविवारी ट्विट केलं. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरयाणा सरकारनं त्याला ६ कोटी बक्षीस देण्याची घोषणा केली. BCCI नेही टोकियोतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा केली 4 / 9हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नीरज चोप्राचे कौतुक केले. त्यांनी नीरजला ६ कोटी रोख रुपयांच्या बक्षीसांसह क्लास वन जॉब देण्याची घोषणा केली. त्याशिवाय हरयाणा सरकारकडून जमीन खरेदीत त्याला ५० टक्के सवलत व पंचकूला येथे सेंटर ऑफ एक्सीलेंसची स्थापना. 5 / 9बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला १ कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला १.२५ कोटी रुपये देणार आहे. 6 / 9पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या नीरजला दोन कोटी रोख रक्कम देण्याचे जाहीर केले. मणिपूर सरकारनंही १ कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली. 7 / 9रेल्वेकडूनही टोकियो ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना रोख बक्षीस जाहीर केले गेले. सुवर्णपदक विजेत्या नीरजला ३ कोटी आणि त्याच्या प्रशिक्षकांना २५ लाख देण्याचे जाहीर केले. तेच रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दोन कोटी व त्यांच्या प्रशिक्षकांना प्रत्येकी २० लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी १ कोटी व त्यांच्या प्रशिक्षकांना १५ लाख देण्यात येणार आहेत. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना ७.५ लाख रुपये दिले जातील.8 / 9भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ४० लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना २५ लाख आधीच जाहीर केले गेले आहेत. 9 / 9चेन्नई सुपर किंग्सनंही नीरजला १ कोटींचे बक्षीस व खास जर्सी देण्याचे जाहीर केले. तेच बायजूकडूनही दोन कोटी मिळणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications