Neeraj chopra's 'price' increased, leaving Rohit Sharma behind in advertise field
नीरजचा 'भाव' वधारला, रोहित शर्माला टाकले मागे By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 1:29 PM1 / 10टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने कोट्यवधी भारतीयांचीही मने जिंकली आहेत. त्यामुळेच, त्याची फॅन फॉलोविंग वाढली आहे. 2 / 10नीरजची सहजता, सरलता आणि देशप्रेमामुळे तो दिग्गजांचाही चाहता बनला आहे. भारताला अॅथलेटमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून देत, त्याने इतिहास रचला आहे. 3 / 10नीरजच्या कामगिरीची दखल देशाने घेतली, आता देश-विदेशातील जाहिरात कंपन्याही त्याची दखल घेताना दिसत आहेत. जाहिरात विश्वातही नीरजला सोनेरी झळाली मिळाली आहे. 4 / 10टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि नीरज यांच्यात सध्या जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे. क्रिकेटचा विराट आणि क्रीडा विश्वाचा नीरज यांच्यात जाहिरात विश्वातील स्पर्धा सुरू आहे. 5 / 10मीडिया रिपोर्टनुसार नीरजनं जाहिरातीची फी दहापटीने वाढवली. त्यामुळे, जाहिरात विश्वात आता नीरजच्या पुढे केवळ विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. 6 / 10ऑलिम्पिकपूर्वी नीरज जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला 15 ते 25 लाख रूपये कमावत होता. आता, त्याची फी 10 पट अधिक वाढली आहे. नीरजपेक्षा विराट जाहिरातीसाठी अधिक मानधन घेतो. 7 / 10नीरजने रोहित शर्मा, केएल राहुल यांनाही मागे टाकले आहे. ते जाहिरातीसाठी वार्षिक 50 लाख ते 1 कोटी फी घेतात. आता नीरज यांच्यापुढे गेला आहे. 8 / 10'इकोनॉमिक्स टाईम्स'च्या वृत्तानुसार नीरजचं काम पाहण्याऱ्या कंपनीची सध्या लग्झरी ऑटो आणि कपड्याच्या ब्रँडशी चर्चा सुरू आहे. एकूण 5 ते 6 डीलबाबत त्याची चर्चा सुरू आहे. 9 / 10पॅरीसमध्ये 2024 साली होणाऱ्या ऑलिम्पिकपर्यंतचे हे करार आहेत, अशी माहिती नीरजचं व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्तफा घोष यांनी दिली आहे.10 / 10नीरजने आता जाहिरात विश्वातही घोडदौड सुरू केली असून त्याचा भाव चांगलाच वधारला आहे आणखी वाचा Subscribe to Notifications