net worth of world champion Neeraj Chopra- has an estimated net worth of INR 37.17 crores
वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्राची एकूण संपत्ती किती? २ कोटींची कार अन् ११ लाखांची Bike By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 2:22 PM1 / 6भालाफेकपटू नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) रविवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गोल्ड जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आणि त्याच्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव झाला.2 / 6२०१६च्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्ण जिंकणारा नीरज पहिल्यांदा चर्चेत आला होता. २०२० च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते आणि २००८ नंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गोल्ड जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. 3 / 6ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून ते आतापर्यंत नीरजची नेटवर्थही खूप वाढली आहे.२५ वर्षीय नीरज चोप्राचे हरयाणातील पानिपत येथे ३ मजली आलिशान घर आहे. नीरजच्या मालकीची ही सर्वात महागडी मालमत्ता असल्याचे म्हटले जाते. 4 / 6नीरज चोप्राला महागड्या कार आणि बाइक्सचा शौक आहे. त्याच्याकडे जवळपास १ कोटी किंमत असलेल्या फोर्ड मस्टँग ही महागडी स्पोर्ट्स कार आहे. नीरजने नुकतीच रेंज रोव्हर स्पोर्ट कारही खरेदी केली होती. या लक्झरी एसयूव्हीची किंमत १.९८ कोटी ते २.२२ कोटी आहे. त्याच्या बाईक कलेक्शनमधील सर्वात महागडी बाईक Harley Davidson 1200 Roadster आहे ज्याची किंमत ११ लाख रुपये आहे.5 / 6नीरज अनेक ब्रँडसोबत काम करतो आणि करोडो रुपये कमवतो. जेव्हा त्याने ब्रँड्सशी करार केला तेव्हा त्याची सुरुवातीची कमाई २.५ कोटींहून अधिक होती. अलीकडील अंदाजानुसार, नीरज चोप्राची एकूण संपत्ती $4 ते $5 दशलक्ष दरम्यान आहे, म्हणजेच ३३ ते ३५ कोटी आहे. 6 / 6आलिशान घर, पुरस्कार, कार इत्यादींमुळे नीरजची एकूण संपत्ती सतत वाढत आहे. नीरजची संपत्ती २०२० मध्ये १० कोटी, नंतर २०२१ मध्ये २० कोटी, २०२२ मध्ये ३० आणि आता २०२३ मध्ये त्याची एकूण संपत्ती ३५ कोटी इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications