ninth season of the Pro Kabaddi League has started and pardeep narwal is part of the UP Yoddha team
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डीच्या ९व्या हंगामास सुरूवात! जाणून घ्या हे ५ दिग्गज यंदा कोणत्या संघातून खेळणार By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 1:17 PM1 / 5प्रो कबड्डीमधील सहाव्या हंगामापासून आठव्या हंगामापर्यंत बंगळुरू बुल्ससाठी कहर करणारा पवन सेहरावत आता थलायवाससोबत खेळताना दिसणार आहे. हंगाम ९च्या बोलीमध्ये तामिळ थलायवासच्या संघाने पवन सेहरातवर २.२६ कोटींची विक्रमी बोली लावली होती. 2 / 5आठव्या हंगामात अर्जुन देशवाल पँथर्सपैकी एक होता ज्याने आपल्या संघाला अडचणीच्या काळातून बाहेर काढले. यामुळेच हंगाम आठ पॅंथर्सचा कर्णधार दीपक हुडालाही संघाबाहेर बसावे लागले होते मात्र अर्जुनला संघाबाहेर जावे लागले नव्हते. यंदाही हा युवा खेळाडू जयपूर पिंक पँथर्सकडून खेळणार आहे.3 / 5बंगाल वॉरियर्सला आपल्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवणाऱ्या मनिंदर सिंगने संघ सोडलेला नाही. मागील हंगामात मनिंदर सिंगने एकट्याने संघाची धुरा सांभाळली होती. पण संघाला प्लेऑफमध्येही पोहोचवण्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात मनिंदर वॉरियर्ससोबतच खेळणार आहे.4 / 5प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात वेगवान चढाईपटू (Raider) नवीन कुमारने ८व्या हंगामाच्या सुरुवातीला दाखवून दिले की तो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात घातक खेळाडू आहे. सलग सातवेळा सुपर-१० करणाऱ्या नवीनने दिल्लीला चॅम्पियन बनवून सुटकेचा नि:श्वास सोडला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील संपूर्ण कबड्डी चाहत्यांचे लक्ष या युवा खेळाडूच्या खेळीवर असणार आहे. 5 / 5चढाईत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम असो की कबड्डीच्या इतिहासातील सर्वाधिक चढाईचे गुण यामध्ये प्रदीप नरवालचे नाव नाही असे होऊ शतक नाही. प्रदीप नरवालने विक्रमी गुण मिळवून प्रो कबड्डीत आपले वर्चस्व राखले आहे. हा योद्धा मागील हंगामात फॉर्ममध्ये नव्हता, तरीही त्याने १५० हून अधिक गुण मिळवले होते. यावेळी देखील प्रदीप नरवाल यूपी योद्धाच्या संघाकडून प्रमुख चढाईपटूची धुरा सांभाळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications