Not only the doctor to fight Corona Virus, but the player came to help svg
Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरच नव्हे, तर खेळाडूही आले मदतीला By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 10:35 AM1 / 10कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या मदतीला काही खेळाडूही आता पुढे आले आहेत. इंग्लंडची महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिदर नाइटने ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. 2 / 10ती तिथे स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. 29 वर्षीय हिदर येथील हॉस्पिटल्सना औषध पोहोचवण्याचं काम करत आहे.3 / 10ऑस्ट्रेलियाच्या महिला हॉकी संघाची गोलरक्षक रशेल लिंच एक रजिस्टर्ड नर्स आहे.4 / 10लंडन ऑलिम्पिक ( 2012) स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नेदरलँड्सच्या हॉकी संघाची गोलरक्षक जॉयसे सोम्ब्रोएक आता डॉक्टर म्हणून देशाला कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मदत करत आहे.5 / 10टोक्यो ऑलिम्पिक रद्द झाल्यानंतर तिनं कोरोना व्हायरसच्या क्लीनिकमध्ये नर्स म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. 6 / 1026 वर्षाचा असताना तिनं निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर तिनं अॅम्स्टरडॅम येथील व्रिजे युनिव्हर्सिटीतून वैद्यकीय पदवी घेतली. 7 / 10इंडियन सुपर लीगमध्ये बंगळुरू एफसी क्लबचा माजी खेळाडू टोनी डोवाले सध्या कोरोना रुग्णांची काळजी घेत आहे.8 / 10डोवालेकडे फार्मासिस्टची पदवी आहे आणि त्यानं स्पेनची परिस्थिती पाहता मदतीसाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला.9 / 10फुटबॉलपटू अॅलेक्स चार्लटनने खेळ सोडून न्यूयॉर्कमध्ये नर्सिंगच्या कामाला सुरुवात केली आहे. 10 / 102018मध्ये त्यानं नर्सिंगची पदवी घेतली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications