धक्कादायक; सहाव्या माळ्यावरून खाली पडून 20 वर्षीय ऑलिम्पिकपटूचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:28 AM
1 / 10 एकाटेरिना अॅलेस्झांड्रोवक्साया हिचे रविवारी निधन झाले. 20 वर्षीय एकाटेरिनानं 2018च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. 2 / 10 ऑलिम्पिकपटूचे निधन होण्याची ही मागील 12 दिवसांतील दुसरी घटना आहे. 8 जुलैला दोन वेळचा विश्वविजेता स्नोबोर्डर अॅलेक्स पुलिनचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. 3 / 10 एकाटेरिना हिचा जन्म रूसचा, परंतु 2016मध्ये तिनं ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळवले आणि त्यांच्याकडून तिनं स्केटिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं. 4 / 10 2018च्या पेयांगचांग ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं सहकारी हार्ले विंडरससह सहभाग घेतला होता. 5 / 10 अनेक दुखापतींमुळे तिनं फेब्रुवारी महिन्यात निवृत्ती घेतली होती. 6 / 10 एका वृत्तानुसार मॉस्को येथील घरातील खिडकीतून पडून तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. 7 / 10 एकाटेरिनाचे प्रशिक्षक आंद्रेई खेकालो यांनी सांगितले की,''मॉस्को येथे सहाव्या माळ्यावरून ती खिडकीतून खाली पडली.'' 8 / 10 रशियन मीडियाच्या वृत्तानुसार एकाटिरेननं आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तिनं एक नोट लिहिली आणि त्यात I LOVE असे नमूद केले होते. 9 / 10 रशियन मीडियाच्या वृत्तानुसार एकाटिरेननं आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तिनं एक नोट लिहिली आणि त्यात I LOVE असे नमूद केले होते. 10 / 10 रशियन मीडियाच्या वृत्तानुसार एकाटिरेननं आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तिनं एक नोट लिहिली आणि त्यात I LOVE असे नमूद केले होते. आणखी वाचा