शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोन, कंडोम आणि…, ऑलिम्पिकमधील खेळाडूंना वेलकम किटसह मिळताहेत या वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 5:21 PM

1 / 6
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आजपासून औपचारिक सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील १० हजारांहून अधिक क्रीडापटू सहभागी होणार आहेत. पॅरिसमध्ये या क्रीडापटूंना राहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी विशेष सोईसुविधाही दिल्या जात आहेत.
2 / 6
स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये दाखल होत असलेल्या या क्रीडापटूंना देण्यात येत असलेल्या सोईसुविधांची एका वेगळ्याच कारणासाठी चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे या क्रीडापटूंना वेलकम किटसोबत देण्यात येत असलेल्या वस्तू. या क्रीडापटूंना राहण्याच्या आणि खाण्याच्या सुविधांसोबतच कंडोम आणि इंटिमेसीशी संबंधित इतर वस्तूसुद्धा दिल्या जात आहेत.
3 / 6
पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांकडून क्रीडापटूंना मोफत कंडोम उपलब्ध करून दिले जात आहेत. एवढंच नाही तर त्यासोबत इंटिमेसीशीसंबंधित इतर काही वस्तूही दिल्या जात आहेत. पॅरिसमधील क्रीडाग्रामात कंडोमची पाकिटं दिसून आली आहेत. क्रीडाग्रामामध्ये सुमारे २० हजार कंडोमची पाकिटं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. सरासरी एका क्रीडापटूसाठी सुमारे १४ कंडोमची व्यवस्था करण्यात आली आहे.
4 / 6
याशिवाय १० सुमारे १० हजार डेंटल डेम्सही ठेवण्यात आले आहेत. तसेच इंडिमेसीशी संबंधित वैद्यकीय सुविधाही आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका क्रीडापटूने सांगितलं की, सध्यातरी आपलं लक्ष हे शर्यतीवर आहे. त्यानंतर जेव्हा मौजमजा करण्याची वेळ येईल, तेव्हा खूप मजा करू.
5 / 6
दरम्यान, कॅनडाच्या एका क्रीडापटूने त्याच्या टिकटॉक अकाऊंटवर पॅरिसमध्ये मिळत असलेल्या कंडोमचा फोटो शेअर केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या कंडोमच्या पाकिटांवर वेगवेगळे संदेशही लिहिलेले आहेत. त्यामुळे या पाकिटांची चर्चा होत आहे.
6 / 6
याबरोबरच क्रीडापटूंना वेगवेगळ्या सुविधाही दिल्या जात आहेत. त्यामध्ये फोनचा समावेश आहे. एवढंच नाही तर काही क्रीडापटू त्यांच्या खोलीमध्ये ठेवण्यात आलेल्या बेडवर उड्या मारून त्याची तपासणी करून घेत आहेत.
टॅग्स :Franceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीय