शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रविच्या विजयामागे वडिलांचा संघर्ष; रोज 70 किमीचा प्रवास करून मुलापर्यंत पोहोचवायचे दूध अणि लोणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 10:15 AM

1 / 11
आज रवी दहिया (Ravi Dahiya ) हा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. त्याच्या या यशामागे आहे त्याच्या वडिलांचा दीर्घ संघर्ष... दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीचे डावपेच शिकत असलेला आपला मुलगा कमकुवत पडू नये, म्हणून वडील राकेश दहिया हे रोज 70 किलोमीटरचा प्रवास करून त्याच्यासाठी दूध आणि लोणी घेऊन जात आणि त्याच्या सर्व गरजा पूर्ण करत. (Olympics 2020 A long struggle of father behind success of ravi dahiya in tokyo olympics)
2 / 11
राकेश दहिया स्वतः एक पैलवान होते - राकेश दहिया हे स्वतःच एक पैलवान राहिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवावे असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
3 / 11
पुढे, राकेश दहिया हे भलेही कुस्तीपासून दूर गेले असतील, पण त्यांच्यातला खेळाडू नेहमीच जिवंत राहिला आणि आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना कुस्तीसाठी प्रेरित केले आणि आज तो क्षण आला.
4 / 11
राकेश दहिया यांच्या मुलाने केवळ वडिलांची मेहनत आणि त्याचा संघर्षच यशस्वी केला नाही, तर त्याना एक अशी भेटही दिली, जिची ते आपल्या तारुण्यापासूनच वाट पाहत होते.
5 / 11
वडिलांनी अडचणींवर केली मात, मुलानं ऑलिम्पिकमध्ये पैलवानांना केलं 'गार' - रवी दहियानं ऑलिम्पिकमध्ये मॅटवर कुस्ती करून जिंकला, त्यानं जागतिक दर्जाच्या खेळाडूंना हरवलं. यासाठी त्याचे वडील राकेश दहिया, हे प्रत्यक्ष जीवनात लढले आणि त्यांनी आर्थिक परिस्थितीला वाकुल्या दाखवत प्रत्येक अडचणीवर मात केली.
6 / 11
शेतावर काम करणारे राकेश दहिया रोज नाहरी येथून 70 किलोमीटरचा प्रवास करून दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर मुलाला दूध आणि लोणी देण्यासाठी जात.
7 / 11
राकेश दहिया, हे रोज सकाळी साडेतीन वाजता उठत आणि पाच किलोमीटर चालत रेल्वे स्टेशनवर पोहोचत. यानंतर आझादपूर स्टेशनवर उतरल्यानंतर ते दोन किलोमीटर परत चालत जात छत्रसाल स्टेडियमवर पोहोचत.
8 / 11
आज राकेश यांच्या या संघर्षाचे चीज झाले आहे. त्यांच्या या दिनचर्येने त्यांच्या लाडक्या मुलाला विश्व पटलावर चमकावले आहे.
9 / 11
रवी कुमार दहियानं ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला आहे.
10 / 11
ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात रवी दहियानं प्रतिस्पर्धी कझाकिस्तानच्या खेळाडूकडूचा पराभव केला. यावेळी रडिचा डाव खेळत त्याने रवीच्या दंडावर चावा घेतला. त्याने घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरावे लागणार आहे.
11 / 11
रवी कुमार दहिया
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021JapanजपानHaryanaहरयाणाIndiaभारतWrestlingकुस्ती