- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरोधात चार सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी विजयी आघाडी घेत जिंकली. यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. हा आनंद भारतीय संघ जिंकल्याचा नाही तर पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर पोहोचल्यामुळे झाला आहे. पाकिस्तानी चाहत्यांनी आपला हा आनंद व्यक्त करताना रडीचा डाव खेळत सोशल मिडियावर विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे. यामुळे भारतीय चाहते प्रचंड नाराज झाले असून सोशल मिडियावर चाहत्यांमध्ये युद्ध सुरु झालं आहे. (भारत-वेस्ट इंडिज सामना अनिर्णित, पाकिस्तान अव्वल स्थानावर) वेस्ट इंडिज् विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामना पावसामुळे अखेर अनिर्णीत राहिल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताची पिछेहाट झाली . त्यामुळे भारताचे कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याच्या स्वप्नांवर पावसाने पाणी फेरले. भारत वि. विडिंज यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल न लागल्याने पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीचे फोटो मॉर्फ करुन खिल्ली उडवली आहे. एका फोटोमध्ये कप्तान मिसबाह उल हक रिंगमध्ये विराट कोहलीला खांद्यावर घेऊन उभा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर दुस-या फोटोत मिसबाह उल हक राजेशाही थाटात बसला आहे आणि विराट कोहली बाजूला उभा असलेलं दाखवलं गेलं आहे. याअगोदर बांगलादेशमधील क्रिकेट चाहत्यांनी कप्तान महेंद्रसिंग धोनीचा मुंडकं छाटलेला फोटो वापरुन भारतीय चाहत्यांना भडकवलं होतं.२००० नंतर आयसीसीने कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्मवारी जाहीर करण्यास सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्तानला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर येता आलं नव्हते पण भारत -वेस्ट इंडिजचा सामना अनिर्णित राहीला आणि पाकिस्तानला ती संधी चालून आली. अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी पाक क्रिकेट संघाला १६ वर्षाचा कालावधी लागला.