Paraguayan swimmer Luana Alonso was sent back from Paris Olympics 2024
अफाट सौंदर्याने पाडलं संकटात; पॅराग्वेच्या जलतरणपटूला सुंदर दिसण्यावरुन ऑलिम्पिकमधून पाठवलं घरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 11:53 AM1 / 7नुकतेच पॅराग्वेची जलतरणपटू लुआना अलोन्सो हिला वाईट वृत्तीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी पाठवण्यात आले होते. त्यानंतर तिने जलतरण स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे. 2 / 7मात्र आता या सगळ्या प्रकरणात वेगळीच बातमी समोर आली आहे. लुआना अलोन्सोला तिच्या वागण्यावरुन नाहीतर वेगळ्याच कारणासाठी मायदेशी पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे.3 / 7इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, लुआनाला मायदेशी पाठवण्यात कारण तिचे अफाट सौंदर्य आहे. तिच्या सौंदर्याने तिच्याच संघातील उर्वरित खेळाडूंचे लक्ष विचलित करत असल्याचे कारण देण्यात आलं आहे.4 / 7लुआनाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. मात्र तिचे सौंदर्य हे पॅरिस ऑलिम्पिक खेळाडू आणि तिच्यासाठी खूप महागात पडली आहे.5 / 7पॅराग्वेला परतल्यानंतर लुआना अलोन्सो जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केवळ तिच्या सौंदर्याने हे घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.6 / 7११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पॅरिस गेम्सच्या अधिकृत समारोपापर्यंत खेळाडूंना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र लुआनाला तिचे निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे लुआना मायदेशी परतली.7 / 7लुआनाच्या राष्ट्रीय संघ व्यवस्थापकाने दावा केला की तिच्या वर्तणुकीमुळे संपूर्ण पॅराग्वे संघावर वाईट प्रभाव पाडत आहे. मात्र स्वत: लुआनाने अद्याप ऑलिम्पिक गाव सोडण्यास सांगितलेल्या मुद्द्यावर भाष्य केलेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications