शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आई-वडिलांच्या स्वप्नातील कार, 'प्रग्या'ला आनंद; महिंद्रांच्या ट्विटने पुन्हा जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 7:23 PM

1 / 10
अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे.
2 / 10
प्रग्यानंद आज मायदेशी परतला असून चेन्नई विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी पाहून प्रग्यानंदने आनंद व्यक्त केला आहे.
3 / 10
विशेष म्हणजे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला तो वयाने सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. त्याच्या या जगजेत्तेपदाच्या स्वप्नाचं कौतुक करत उद्योगपती आनंद महिंद्रांनी मोठी घोषणा केली आहे.
4 / 10
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रज्ञानंदच्या या यशाचं देभरातून कौतुक झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रज्ञानंदचे कौतुक केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
5 / 10
आता, उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही मन जिकंलं आहे. म्हणून, त्यांनी प्रज्ञानंदला खास गिफ्ट देऊ केलं आहे. ते गिफ्ट प्रग्यानंदऐवजी त्याच्या पालकांसाठी असल्याचंही ते म्हणाले.
6 / 10
आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणून, मी प्रज्ञानंद ऐवजी त्याच्या आई-वडिलांना XUV 400 ही कार गिफ्ट देऊ इच्छितो.
7 / 10
आपल्या मुलास बुद्धीबळ खेळासाठी प्रोत्साहन आणि बळ देण्याचं काम त्यांनी केलंय. आपण, सर्वजण त्यांचे आभार मानले पाहिजे, असेही महिंद्रा यांनी म्हटलं.
8 / 10
आनंद महिंद्रांच्या ट्विटला प्रग्यानंदने रिट्विट करत आभार मानले आहेत. तसेच, माझ्या आई-वडिलांचं खूप वर्षांपासूनचं कार घेण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, असेही प्रग्यानंदने म्हटले.
9 / 10
विशेष म्हणजे प्रग्यानंदच्या ट्विटला महिंद्रा यांनी पुन्हा अफलातून रिप्लाय दिलाय. ''स्वप्नांना सत्यात बदलणे हे कार निर्मात्याचे अंतिम ध्येय आहे, प्रग्ना.'' असा भारदस्त रिप्लाय आनंद महिंद्रांनी प्रग्यानंदच्या ट्विटला दिला आहे.
10 / 10
दरम्यान, आनंद महिंद्रांच्या या दर्यादिलपणाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. कारण, नेटीझन्सनेच महिंद्रांकडे प्रग्यानंदला कार गिफ्ट देण्याची मागणी केली होती.
टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राChessबुद्धीबळIndiaभारतcarकारMahindraमहिंद्रा