शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॅरालिम्पिक स्पर्धेतील अभिमानास्पद क्षणांची खास झलक, इथं पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:53 PM

1 / 5
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अवनी लेखरानं सुवर्ण वेध साधला आणि पॅरिसमध्ये तिरंगा अगदी अभिमानानं फडकला. जगाच्या मानाच्या स्पर्धेत ३० ऑगस्ट, २०२४ रोजी भारताचे राष्ट्रगीत वाजल्यामुळं तमाम भारतीयासांठी हा दिवस खास ठरला.
2 / 5
महिला गटातील नेमबाजीतील १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात अवनी लखेरा हिने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले.
3 / 5
नेमबाजीतील याच इवेंटमध्ये म्हणजे १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात मोना अग्रवालनंही कांस्य पदकाची कमाई केली.
4 / 5
मैदानी खेळात प्रीती पाल हिने इतिहास रचला. महिला गटातील १०० मीटर T35 प्रकारात तिने कांस्य पदकाची कमाई केली.
5 / 5
नेमबाजीत मनीष नरवाल यानेही रौप्य पदकासह पोडिअम फिनिश परफॉमन्स देत नेमबाजीतील तिसरे आणि भारताच्या खात्यात चौथ्या पदकाची नोंद केली. त्याने पुरुष गटातील १० मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकले.
टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाParisपॅरिसShootingगोळीबारViral Photosव्हायरल फोटोज्