शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निळ्याशार डोळ्यांची परी; Paris Olympics मध्ये जगातील सर्वात सुंदर अ‍ॅथलीटचा जलवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:58 PM

1 / 7
Paris Olympics 2024 Alica Schmidt : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अनेक खेळाडूंवर साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या. स्पर्धेत भाग घेणाऱ्या अनेक खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. मात्र काही खेळाडू असे होते, ज्यांनी त्यांच्या टॅलेंटसोबतच सौंदर्यानेही अनेकांना वेड लावले.
2 / 7
या अतिशय सुंदर अॅथलीटचे नाव एलिका श्मिट (Alica Schmidt) आहे. अलिका श्मिटचे सौंदर्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिने तिच्या खेळासोबतचत सौंदर्याने लोकांची मने जिंकली आहेत.
3 / 7
अलिका श्मिट ही ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. तिने 4*400 मीटर रिले शर्यतीत भाग घेतला होता. मात्र, तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अलिका श्मिटने भलेही पदक जिंकले नाही, पण आपल्या सौंदर्याने लाखो हृदयात स्थान मिळवले.
4 / 7
ऑस्ट्रेलियन मासिक बस्टेड कव्हरेजने जर्मनीच्या अलिका श्मिटचे 'जगातील सर्वात सेक्सी ऍथलीट' म्हणून वर्णन केले आहे. ती आपल्या सौंदर्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अभिनेत्रींना मागे टाकते.
5 / 7
एलिका श्मिटचा जन्म 8 नोव्हेंबर 1998 रोजी वर्म्स, जर्मनी येथे झाला. 25 वर्षीय अलिका श्मिट ही जगातील सर्वात सुंदर ॲथलीट मानली जाते. एलिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.
6 / 7
सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे की, अलिका श्मिट ॲथलीट कमी आणि मिस वर्ल्ड जास्त दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिका श्मिटकडे मॉडेलिंग असाइनमेंट येत राहतात. सध्या अलिकाचे इंस्टाग्रामवर 60 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
7 / 7
दरम्यान, अलिका श्मिट आपल्या सौंदर्यासोबतच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिच्याबद्दल अशी एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. एलिकाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेकांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा सोशल मीडियातून केला जात आहे, पण त्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Germanyजर्मनीAustraliaआॅस्ट्रेलिया