Paris Olympics 2024 Chance for Manu Bhaker to win another medal
Paris Olympics : मनू भाकरला हॅट्ट्रिक करण्याची मोठी संधी; आता सुवर्ण पदकासाठी लढत By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:17 PM1 / 7मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून तिने इतिहास रचला आहे. आता मनूला आणखी एका स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.2 / 7२२ वर्षीय महिला नेमबाजपटू मनू भाकरने यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारतासाठी पहिले पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले.3 / 7नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यांसह, ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले.4 / 7मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजही इतिहास रचला. या भारतीय जोडीने कोरियाच्या खेळाडूंचा १६-१० असा पराभव करून देशाला या ऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक मिळवून दिले.5 / 7मनू आणि सरबजोत यांनी पात्रता फेरीत ५८० गुण मिळवत कांस्यपदकापर्यंत मजल मारली. ‘मला खूप अभिमान वाटतो आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार, अशा शब्दात मनू भाकरने आपल्या भावना व्यक्त केल्या.6 / 7मनूला आता अजूनही २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि तिले तिसरे पदक जिंकण्याचीही संधी आहे. या स्पर्धा २ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.7 / 7कांस्यपदक जिंकल्यानंतर, मनू तिचा साथीदार सरबज्योत सिंगसोबत खूप आनंदी दिसत होती. तिला आता पदकांची हॅट्रिक करता येईल का असे विचारले असता ती म्हणाली की ,पदक जिंकण्यासाठी ती सर्वस्व देईल आणि हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल. आणखी वाचा Subscribe to Notifications