शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर किती पैसे मिळतात? वाचून व्हाल अवाक्, विश्वासही बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 2:05 PM

1 / 5
सध्या फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील क्रीडापटू पदकांसाठी चढाओढ करत आहेत. तसेच पदकविजेत्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
2 / 5
भारतालाही या स्पर्धेत आतापर्यंत ३ कांस्यपदकं जिंकली आहेत. ही तिन्ही पदकं नेमबाजी या क्रीडा प्रकारात मिळाली आहेत. मनू भाकर, सरबज्योत सिंह आणि स्वप्निल कुसाळे यांनी भारताला हे यश मिळून दिलं आहे. या विजेत्यांना भारतातील राज्य केंद्र सरकारकडून बक्षिसं जाहीर होत आहेत.
3 / 5
ऑलिम्पिकमध्ये खेळणं आणि तिथे पदक जिंकणं हे प्रत्येक क्रीडापटूचं स्वप्न असतं. पण ऑलिम्पिकचं पदक जिंकल्यावर पदक विजेत्याला किती रक्कम दिली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? याचं उत्तर खालील प्रमाणे आहे.
4 / 5
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीत ऑलिम्पिक समितीकडून पदकाशिवाय अन्य कुठलंही बक्षीस किंवा रोख रक्कम दिली जात नाही. भारतीय ऑलिम्पिक संघही विजेत्या खेळाडूंना बक्षीस म्हणून पैसे देत नाही.
5 / 5
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना भारत सरकारकडून बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली जाते. सरकारने सुवर्णपदक जिंकणाऱ्यांना ७५ लाख, रौप्यपदक जिंकणाऱ्यांना ५० लाख आणि कांस्यपदक जिंकणाऱ्यांना ३० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. याशिवाय राज्य सरकार आपल्या राज्यातील खेळाडूंना रोख रक्कम तसेच इतर बक्षीसं देते.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Internationalआंतरराष्ट्रीय