शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी खेळाडू; व्हिडीओ व्हायरल; अभिनेता म्हणाला, न खेळताच 'गोल्ड' द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 2:29 PM

1 / 10
पॅरिसच्या धरतीवर जगभरातील खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करून पदकासाठी लढत आहेत. भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.
2 / 10
पदक जिंकण्याच्या यादीत अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे देश अनुक्रमे आघाडीवर आहेत. भारताने इतर खेळांच्या तुलनेत तिरंदाजीत खूपच निराशाजनक कामगिरी केली.
3 / 10
पण, दक्षिण कोरियाची तिरंदाज Chou Tzuyu भारतीयांना प्रभावित करून गेली. तिची एक जुनी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टोकियो ऑलिम्पिकमधील असल्याचे कळते.
4 / 10
बॉलिवूड अभिनेता कमाल खानने तर तिला न खेळता सुवर्ण पदक द्यायला हवे अशी मिश्किल टिप्पणी केली.
5 / 10
खरे तर २५ वर्षीय Chou Tzuyu ही एक ॲथलीट नसून गायक आणि डान्सर आहे. १४ जून १९९९ साली जन्मलेल्या या कोरियन खेळाडूने तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले.
6 / 10
तिचे पालक पेशाने व्यावसायिक आहेत. आर्थिक बाजू मजबूत असल्याने Chou Tzuyu ने विविध स्पर्धांमध्ये भाग घेत मोठे सहज मोठ्या व्यासपीठापर्यंत मजल मारली.
7 / 10
२०१२ मध्ये ताइनानमध्ये म्युझ परफॉर्मिंग आर्ट्स वर्कशॉप दरम्यान एका स्काउट्सने चाऊ त्झ्यूची प्रतिभा ओळखली. मग नोव्हेंबर २०१२ मध्ये दक्षिण कोरियाला गेली.
8 / 10
परदेशात राहण्याची आणि नवीन भाषा शिकण्याची आव्हाने असतानाही, तिने गायन, नृत्य आणि अभिनय यातील तिची कौशल्ये पटकन सुधारली.
9 / 10
२०१५ मध्ये Chou Tzuyu ने रिॲलिटी सर्व्हायव्हल शो Sixteen मध्ये भाग घेतला, जो JYP Entertainment च्या नवीन मुलींच्या ग्रुपसाठी सदस्य निवडण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता.
10 / 10
तेव्हा ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली अन् तिला एक वेगळी ओळख मिळाली. तिची प्रतिभा, कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Social Viralसोशल व्हायरल