शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 2:01 PM

1 / 10
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. ११ ऑगस्टपर्यंत विविध क्षेत्रातील खेळाडू पदकासाठी लढतील. ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घालणे म्हणजे सोपे काम नव्हे.
2 / 10
मागील ऑलिम्पिकमध्ये अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना सात पदके जिंकता आली होती. यामध्ये नीरज चोप्राच्या एका सुवर्ण पदकाचा समावेश होता.
3 / 10
पण, तुम्हाला माहिती आहे का? ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपे... होय, या जोडप्याने एक दोन नव्हे तर तब्बल १५ पदके जिंकली आहेत.
4 / 10
२३ मार्च १९८८ साली जन्मलेला सर जेसन केनी हा इंग्लंडचा माजी ट्रॅक सायकलस्वार आहे. तो वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात तरबेज होता.
5 / 10
केनी हा सर्वाधिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा ब्रिटिश खेळाडू आहे. त्याने एकूण नऊ पदके जिंकली, त्यात सात सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
6 / 10
लॉरा केनी ही देखील इंग्लंडची माजी सायकलिस्ट आहे. तिने पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.
7 / 10
एका वृत्तसंस्थेशी बोलताना लॉराने खुलासा केला की, मी ब्रिटिश सायकलिंगमध्ये आल्याच्या पहिल्या दिवशी जेसनसोबत माझी ओळख झाली नव्हती. कारण जेसन कॉफीवर अधिक लक्ष केंद्रित करत असे.
8 / 10
मात्र, हळूहळू दोघेही जवळ आले. त्यानंतर २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये दोघेही किस करताना दिसले होते. या ऑलिम्पिकमध्ये दोघांचा चुंबन करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
9 / 10
खरे तर व्हॉलीबॉल कोर्टमध्ये जेसन आणि लॉरा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमच्या मागे किस करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. तेव्हा दोघेही प्रसिद्धीच्या झोतात आले. रिओ ऑलिम्पिकनंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. आता हे कपल एका मुलाचे पालक आहे.
10 / 10
खरे तर व्हॉलीबॉल कोर्टमध्ये जेसन आणि लॉरा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमच्या मागे किस करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. तेव्हा दोघेही प्रसिद्धीच्या झोतात आले. रिओ ऑलिम्पिकनंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. आता हे कपल एका मुलाचे पालक आहे.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Englandइंग्लंड