Paris Olympics 2024 women's shooting bronze medalist Manu Bhaker's net worth is in crores
PHOTOS : २२ वर्षीय मनूची कोट्यवधींमध्ये नेटवर्थ; भगवद्गीता वाचली, 'कर्म' करत राहिली अन् यश मिळवलं By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:13 PM1 / 12मनू भाकर या २२ वर्षीय महिला नेमबाज खेळाडूने यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारतासाठी पहिले पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले.2 / 12तिच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. 3 / 12नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यांसह, ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले. जिन ओह आणि येजी किम या दक्षिण कोरियन नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले.4 / 12मनू भाकरला मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश आले नव्हते. तिचे पिस्तूल खराब झाल्याने तिच्या पदरी निराशा पडली. विजयानंतर प्रतिक्रिया देताना तिने तमाम देशवासियांचे आभार मानले.5 / 12ती म्हणाली की, सर्वांनी मला पाठिंबा दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. यावेळी कांस्य पदक जिंकले असले तरी मी सुवर्ण जिंकण्यासाठी प्रयत्न करेन. मी संयम राखला. हे भगवद्गीता वाचल्यामुळे शक्य झाले असे मी म्हणेन. भगवद्गीतेतील श्लोक तिला खूप मदत करत असे... आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्ती देत. त्यामुळे मी कधीच परिणामांची काळजी केली नाही, असे मनूने आवर्जुन सांगितले. 6 / 12खरे तर मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटी रूपये खर्च झाले असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. तिला जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. इतर खेळाडूही ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतील असा विश्वासही मांडविया यांनी व्यक्त केला.7 / 12नवभारत टाइम्सने रिपोर्ट्च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मनू भाकरची एकूण संपत्ती १२ कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये तिच्या स्पर्धांमधून मिळणारी कमाई तसेच जाहिराती आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. 8 / 12२०१८ मध्ये मनूने युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर हरयाणा सरकारने तिना २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. पण, या घोषणेला मनूने 'जुमला' असे संबोधले होते. त्यावरून तिचा आणि हरयाणा सरकारमधील तत्कालीन मंत्र्याचा वाद झाला होता.9 / 12२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते. नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 10 / 12सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले. 11 / 12आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.12 / 12आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत. आणखी वाचा Subscribe to Notifications