शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paris Paralympics 2024: महाराष्ट्राच्या लेकासह हे भारतीय खेळाडू पदकाचे प्रबळ दावेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 6:02 PM

1 / 8
३३ वर्षीय हरविंद्र सिंग याने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीत भारताला कांस्य पदकाची कमाई करून दिली होती. यावेळी पदकाचा रंग बदलून कामगिरी आणखी सुधारण्याच्या इराद्याने हा खेळाडू मैदानात उतरेल.
2 / 8
जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा खेळाडू सुयश जाधव ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर बॅकस्ट्रोक आणि २०० मीटर वैयक्तिक इवेंटमध्ये सहभागी होणार आहे. २०१८ मध्ये आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने सुवर्ण पदकासह कांस्य पदकही कमावले होते. तो यावेळी पॅरालिम्पिकमध्ये छाप सोडेल, आशा आहे.
3 / 8
गत पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखरा हिने नेमबाजीतील १० मीटर रायफल SH1 प्रकारात गोल्डसह 50 मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. यावेळीही तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
4 / 8
२८ वर्षीय पॅरा बॅडमिंटन स्टार मनदीप कौर हिच्याकडूनही पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकाची आस आहे. २०२२ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीत तिने कांस्य पदकाची कमाई केली होती. पॅरालिम्पिकमध्येही ती चमकदार कामगिरीसह भारताच्या खात्यात पदक जमा करू शकते.
5 / 8
जम्मूची 17 वर्षीय शीतल देवी पॅरा आर्चरी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. २०२२ च्या आशिया पॅरा गेम्समध्ये वैयक्तिक कंपाउंड आणि मिश्र सांघिक कंपाउंड स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळेच पॅरालिम्पिक स्पर्धेत ती ऐतिहासिक कामगिरीसह भारताच्या खात्यात पदक जमा करेल, अशी आशा आहे.
6 / 8
भारताचा स्टार पॅरा भालाफेकपटू अंतील सुमित हा देखील पदकाचा प्रबळ दावेदार आहे. जो टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे.
7 / 8
भालाफेक क्रीडा प्रकारात सुंदर सिंह गुर्जर याच्याकडूनही भारताला अपेक्षा असतील. गत पॅरालिम्पिकमध्ये त्याने कांस्य पदकाची कमाई केली होती.
8 / 8
आर्चरीमध्ये राकेश कुमार या खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील. हा ३८ वर्षीय खेळाडू सुवर्ण पदक पटकवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरेल.
टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा