स्वप्नील कुसाळेसह क्रीडा क्षेत्रातील या मराठमोळ्या चेहऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:38 IST
1 / 8पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकत महाराष्ट्राचा ७२ वर्षांचा पदकी दुष्काळ संपवणाऱ्या स्वप्नील कुसाळे याचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कारासह सन्मान करण्यात आला. 2 / 8स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या कांबळवाडी या छोट्याशा गावातून पॅरिसच्या जगाच्या मानत चमकलेला हिरा आहे. 3 / 8स्वप्नीलला नेमबाजीचे धडे देणाऱ्या कोच दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.4 / 8२००४ मध्ये आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकवणाऱ्या आणि याच वर्षी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या माजी नेमबाजपटू आणि विद्यमान कोच दिपाली देशपांडे या मुंबईकर आहेत.5 / 8पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुष गटातील गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारी याने राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार स्वीकारला.6 / 8सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील करागणी या गावातील पोरानं पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाची मान अभिमानानं उंचावणारी कामगिरी करुन दाखवली आहे. याशिवाय त्याने २०२३ आणि २०२४ मध्ये पॅरा वर्ल्ड चॅम्पियशिप स्पर्धेत सुवर्ण पदक, २०२४ मध्ये आशिया पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. 7 / 8 भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर या माजी खेळाडूला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.8 / 8 १९७२ साली झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. ते हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लापूरचे आहेत.