बाबो! २३० कोटीचा बंगला, ११६ कोटीचं प्रायव्हेट जेट, असं लक्झरी लाइफ जगतो जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 3:23 PM
1 / 10 MMA फायटर मॅक्ग्रेगर (Conor McGregor) जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. कमाईच्या बाबतीत मॅक्ग्रेगरने फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांनाही मागे टाकलं आहे. आपल्या शानदार खेळामुळे कॉनर मॅक्ग्रेगरचे जगभरात कोट्यावधी फॅन्स आहेत. 2 / 10 क्रिकेटमध्ये विराट, फुटबॉलमध्ये रोनाल्डो, टेनिसमध्ये फेडररने जे यश मिळवलं. तसंच कॉनर मॅक्ग्रेगर सुद्धा Mixed Martial Artist (MMA) च्या दुनियेतील किंग आहे. ३२ वर्षीय कॉनर मॅक्ग्रेगर रॅंकिंगमध्ये जगात ५व्या नंबर MMA फायटर आहे. कमाईच्या बाबतीत तो जगातल नंबर वन खेळाडू आहे. 3 / 10 ३२ वर्षीय कॉनर मॅक्ग्रेगर हा आयरलॅंडचा राहणारा आहे. त्याला बालपणापासून MMA फायटर व्हायची इच्छा होती. मॅक्ग्रेगर रिंगमध्ये जगातल्या मोठमोठ्या फायटर्सना काही सेकंदात मात देतो. मॅक्ग्रेगर हा Ultimate Fighting Championship Featherweight आणि Lightweight Double चा चॅम्पियन राहिलेला आहे. 4 / 10 मॅक्ग्रेगर MMA सोबतच बॉक्सींग, किकबॉक्सिंग, कराटे, तायक्वांडो, ब्राझीलियन ज्यू जित्सु आणि कपोएइरा खेळाडूही आहे. 5 / 10 २०२१ मध्ये कोनर मॅक्ग्रेगर १८० मिलियन डॉलर(१३१२ कोटी रूपये)पेक्षा अधिक कमाईसोबतच जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे. कॉनर मॅक्ग्रेगरची एकूण संपत्ती ३०० मिलियन डॉलर (२१८७ कोटी रूपये)पेक्षा अधिक आहे. कोरोना महामारी असूनही कॉनरने २०२१ मध्ये कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. 6 / 10 Forbs नुसार कॉनर मॅक्ग्रेगरने २०२० मध्ये पगार आणि विजेता म्हणून एकूण ३२ मिलियन डॉलरची कमाई केली होती. तर २०२१ मध्ये त्याने ब्रॅन्ड्स आणि काही चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊन १८० मिलियन डॉलरची कमाई केली. मॅक्ग्रेगरकडे Burger King, Beats By Dre, Monster Energy, EA (Electronic Arts), Reebok, Wynn Resorts सारखे ब्रॅन्ड्स आहेत. 7 / 10 कॉनर मॅक्ग्रेगरला लक्झरी लाइफ जगणं फार आवडतं. अमेरिकेत त्याच्याकडे 'MacMansion' नावाचे 3 आलिशान विला आहेत. ज्यांची किंमत १३० कोटी रूपयांच्या आसपास आहे. त्यासोबतच आयरलॅडमध्येही त्याच्या अनेक प्रॉपर्टी आहेत. ज्यांची किंमत १०० कोटी रूपये आहे. 8 / 10 कॉनर मॅक्ग्रेगरला स्पोर्ट्स कारची फार आवड आहे. सध्या त्याच्याकडे Rolls-Royce Ghost, Lamborghini Aventador Roadster, Cadillac Escalade, BMW i8, Rolls-Royce Phantom Drophead Coupe, BMW 730 M Sport, Chevrolet Corvette Stingray और Mercedes-Benz S500 सारख्या लक्झरी कार्स आहेत. या कार्सची किंमत १६० कोटी रूपये इतकी आहे. 9 / 10 कॉनर मॅक्ग्रेगरकडे 'G-CHMF Cessna 560 XL' नावाचं एक प्रायव्हेट जेटही आहे. ज्याची किंमत १६ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी रूपये इतकी आहे. याच जेटने तो त्याच्या इव्हेंट्सला जातो. 10 / 10 कॉनर मॅक्ग्रेगरकडे 'G-CHMF Cessna 560 XL' नावाचं एक प्रायव्हेट जेटही आहे. ज्याची किंमत १६ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी रूपये इतकी आहे. याच जेटने तो त्याच्या इव्हेंट्सला जातो. आणखी वाचा