Pro kabaddi league : कोण आहे टॉप, कोणाचे पारडे जड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:49 IST
1 / 6प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्राच्या इंटर झोन चॅलेंज आठवड्याचा दुसरा टप्प्याला आजपासून सुरू होत आहे. सहाव्या सत्रातील 59 सामने झाले आहेत.2 / 6प्रो कबड्डीच्या सहाव्या सत्रातील पहिले 12 सामने हे इंटर झोन चॅलेंजमधील होते. झोन 'अ' मध्ये यू मुंबा सात विजयांसह अव्वल स्थानावर आहे. यू मुंबाने 425 गुणांची कमाई केली आहे. पुणेरी पलटन दुसऱ्या, तर गुजरात फॉर्च्युनजायंट्स तिसऱ्या स्थानावर आहेत.3 / 6झोन 'ब' मध्ये बंगळुरु बुल्सने सहा विजायांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पाटणा पायरेट्स आणि यूपी योद्धा यांचा क्रमांक येतो.4 / 6यू मुंबाच्या खेळाडूंनी चढाई आणि पकडीत सुरेख खेळ केला आहे. चढाईत सिद्धार्थ देसाई तर पकडीत कर्णधार फजल अत्राचीने अव्वल कामगिरी केली आहे. सिद्धार्थने 10 सामन्यांत 119 गुण कमावले आहेत.5 / 6पकडीत यू मुंबाचा कर्णधार अत्राचीने 11 सामन्यांत 43 गुणांची कमाई करताना आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ नितेश कुमार (40) आणि जयदीप ( 38) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.6 / 6सुपरटेन गुणांच्या कमाईत सिद्धार्थ देसाई टॉपवर आहे. त्याने आतापर्यंत 8 सुपरटेन गुण घेतले आहेत. 7 सुपरटेनसह प्रदीप नरवाल दुसऱ्या स्थानावर आहे.