In the quarter-finals of five Indian boxer AIBA World Youth Women's Boxing Championships
पाच भारतीय बॉक्सर एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 1:53 PM1 / 4ज्योती गुलिया, शशी चोप्रा, अंकिता बोरो, नीतू घनघास आणि साक्षी चौधरी या भारतीय खेळाडूंनी एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी दमदार विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.2 / 4लाईटवेट गटात नीतू घनघास हिनेदेखील पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना बल्गेरियाची टोडोरोवा इमी मारी हिचा ४-१ ने पराभव केला. 3 / 4सत्रातील अखेरच्या उपउपांत्यपूर्व लढतीत ४५ किलो बँटमवेट गटात साक्षी चौधरीने ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित रशियाची शदाबेवा इंदिरा हिला नमविले.4 / 4 हरियानाची ज्योती आणि स्थानिक आकर्षण असलेली अंकुशिता यांनी चाहत्यांच्या उत्साहात कौशल्य पणाला लावून आपापल्या बलाढ्य प्रतिस्पर्धी बॉक्सरला नमविले. आणखी वाचा Subscribe to Notifications