शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रज्ञाननंदाला भात अन् रसम खाता यावं यासाठी परदेशातही स्टोव्ह व कुकर सोबत नेते आई!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 5:53 PM

1 / 6
प्रज्ञाननंदाला उपविजेतेपद मिळाले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महान फलंदाज सचिन तेंडुलकर ते जगभरात त्याचे कौतुक झाले. १८व्या वर्षा वर्ल्ड कपची फायनल खेळणे हिच खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे. या प्रवासात आई नागलक्ष्मी त्याच्या पाठीशी सावली सारख्या उभ्या होत्या. आपल्या लेकराला काय हवं नको, याची सर्व काळजी त्यांनी घेतली.
2 / 6
पालकांनी त्याला आणि बहिणी वैशालीला बुद्धिबळाची ओळख करून दिली, जेणेकरून ही दोघं टीव्ही पाहणे कमी करतील. प्रज्ञाननंदाच्या यशाचे श्रेय त्याची आई नागलक्ष्मी यांना जाते, जी त्याला त्याच्या वर्गात घेऊन जाते, त्यांचे घर सरावासाठी अनुकूल असल्याची खात्री करून घेते आणि त्याच्यासोबत परदेशातील स्पर्धांना जाते.
3 / 6
नागलक्ष्मी या टूर्नामेंटसाठी प्रवास करताना एक इंडक्शन स्टोव्ह आणि तांदूळ कुकर देखील सोबत ठेवतात. जेणेकरून प्रज्ञाननंदाला घरापासून हजारो मैल दूर असतानाही घरचं अन्न मिळू शकेल. “माझ्या पत्नीला श्रेय दिले पाहिजे, ती प्रज्ञाननंदासोबत स्पर्धांमध्ये जाते आणि खूप सपोर्ट करते. ती (दोघांची) खूप काळजी घेते,” असे प्रज्ञाननंदाचे वडील रमेशबाबू यांनी पीटीआयला सांगितले.
4 / 6
ते म्हणाले, “लहानपणी वैशालीची टीव्ही पाहण्याची सवय कमी व्हावी म्हणून आम्ही तिला बुद्धिबळाची ओळख करून दिली होती. त्यानंतर दोन्ही मुलांना हा खेळ आवडला आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आनंद आहे की दोघे बुद्धिबळ खेळण्याचा आनंद घेत आहेत आणि बुद्धिबळाच्या आवडीमुळे ते चांगले खेळत आहेत.'
5 / 6
प्रज्ञाननंदाची बहिण वैशली ही पण महिला ग्रँडमास्टर आहे आणि आंतरराष्ट्रीय सर्किटमधील सर्वात प्रतिष्ठित युवा खेळाडूंपैकी एक आहे. रमेशबाबूंनी सांगितले की, प्रज्ञाननंदाला परदेशात प्रवास करताना घरी शिजवलेले जेवण आवडते, म्हणून त्यांची आई इंडक्शन स्टोव्ह, भात आणि मसाला पॅक करते. यावेळी देखील, नागलक्ष्मीने तिच्या सामानात प्रथम जे सामान पॅक केले ते तांदूळ कुकर आणि मसाला होते, जेणेकरून प्रज्ञाननंदाला अझरबैजानमध्ये रसम आणि भात मिळू शकेल.
6 / 6

टॅग्स :R Praggnanandhaaआर प्रज्ञाननंदाChessबुद्धीबळ