Renee Gracie upset with images being stolen, asks Indians to 'get off her page'
भारतीयांवर भडकली 'पॉर्न स्टार' रेनी ग्रेसी; दिली कायदेशीर कारवाईची धमकी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 11:15 AM1 / 12पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सुपर कार रेसिंगमध्ये रेनी ग्रेसीनं ऐतिहासिक पाऊल ठेवले होते. पुरुषांची ही मक्तेदारी रेनी मोडून काढेल असा विश्वास सर्वांना वाटला होता.2 / 12ऑस्ट्रेलियाच्या सुपर कार रेसिंगमध्ये ट्रॅकवर उतरलेली ती पहिली महिला रेसर होती आणि तिला पाहून अनेक महिला या क्षेत्राचा गांभीर्यानं विचार करू लागले होते.3 / 122013 आणि 2014मध्ये तिनं Porsche Carrera Cup Australia Championship स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली महिला रेसर ठरली होती. अल्पावधीतच तिनं सर्वांचे लक्ष वेधले.4 / 12पण, सात वर्षांच्या रेसिंग करिअरनंतर अचानक तिनं पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला. कार रेसिंग करणं आता पॅशन राहिलं नाही, असं ती म्हणाली.5 / 1225 वर्षीय रेनीच्या निर्णयानं अनेकांना धक्का बसला असेल, परंतु तिला याची पर्वा नाही. या निर्णयानं आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाल्याचे तिनं सांगितलं. 6 / 12डेली डेलेग्राफशी बोलताना तिनं सांगितलं की,''या निर्णयानं माझी व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. मी स्वप्नातही एवढा पैसा पाहिला नव्हता आणि आता माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे.'' 7 / 12''लोकं मला काय बोलतात, त्याची मला पर्वा नाही. मी चांगली रक्कम कमावत आहे आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे,''असं तिनं सांगितले.8 / 12सुरुवातीला न्यूड फोटो अपलोड करून ती आठवड्याला लाखभर रुपये कमवत होती, त्यानंतर तिनं सेक्स व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. तिच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आता ती आठवड्याला 13,43,017 इतके कमावते.9 / 12पण, तिनं भारतीयांवर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय यूजर्स तिच्या नावाचं अनधिकृत पेज सोशल मीडियावर चालवत आहेत आणि तिचे फोटो चोरून वापरत आहेत. त्यामुळे ती रागावली आहे. 10 / 12ती म्हणाली,''भारतीय यूजर्स माझ्या फोटोंचा वापर करत आहेत आणि ते कायदेशीर नाही. त्यांनी माझे फोटो व व्हिडीओ शेअर करणं बंद करायला हवं. मला आता भारतीय लोकं आवडत नाहीत.'' 11 / 12तिनं भारतीय यूजर्सला ब्लॉक केलं आणि शिव्याही दिल्या. हे प्रकार थांबले नाहीत तर कायदेशीर कारवाईची धमकीही तिनं दिली आहे.12 / 12तिनं भारतीय यूजर्सला ब्लॉक केलं आणि शिव्याही दिल्या. हे प्रकार थांबले नाहीत तर कायदेशीर कारवाईची धमकीही तिनं दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications