शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Romantic Love Story: बॉयफ्रेंडसोबत एकत्र राहायचं म्हणून अर्धवट सोडलं शिक्षण; 'या' जोडीची लव्ह स्टोरी आहे खूपच स्पेशल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 6:09 PM

1 / 9
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू फिलीप कुटिन्हो आता लवकरच प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. फिलीप लोन म्हणून एस्टन विला संघाकडून सामने खेळणार आहे.
2 / 9
फिलीप कुटिन्होने जास्त सामने खेळता यावेत यासाठी मानधनातही कपात केली. आता कुटिन्हो बार्सिलोनाचा आपला जुना साथीदार स्टीवन जेरार्ड याच्यासोबत खेळताना दिसणार आहे.
3 / 9
कुटिन्होची लव्ह स्टोरी खूपच स्पेशल आहे. त्याने त्याची बालपणीची मैत्रिण अँनी हिच्याशी लग्न केलं आहे. २००७ साली या दोघांची मैत्री तिसऱ्या एका मित्रामुळे झाली.
4 / 9
दोघेही ब्राझीलच्या रिओ डी जनेरो शहरात लहानाचे मोठे झाले. पण काही वर्षांनी युरोपियन फुटबॉलकडून ऑफर आल्यानंतर तो ब्राझीलबाहेर गेला आणि दोघांनी काही काळ ताटातूट झाली.
5 / 9
अँनीचा जन्म ३१ मार्च १९९३ ला रियो डी जनेरोमध्ये झाला. पण ती मूळची पोर्तुगल वंशाची आहे.
6 / 9
फिलीप २००७ साली इटलीला गेल्यानंतर वर्षभरातच तिनेही बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी शिक्षण सोडलं आणि ती पण इटलीला आली.
7 / 9
फिलीप कुटीन्हो २०१२ साली Espanyol संघाशी जोडला गेल्यानंतर महिन्याभरातच त्याने अँनीशी लग्न केलं. अगदी १४व्या वर्षापासून हे दोघे एकत्र राहू लागले.
8 / 9
फिलीप आणि अँनी या जोडप्याला तीन गोंडस मुलं आहेत.
9 / 9
फिलीप फुटबॉलर म्हणून लोकप्रिय असला तरी अँनी ही इंन्स्टाग्रामवर प्रचंड प्रसिद्ध आहे. लवकरच तिचे १ मिलियन फॉलोअर्स होतील.
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टFootballफुटबॉल