शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War, Dayana Yastremska: रशियन हल्ल्यातून वाचली अन् फायनलमध्ये पोचली... म्हणाली 'युक्रेनसाठी मी जिंकणारच!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 9:44 PM

1 / 9
Russia Ukraine War, Dayana Yastremska: रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये विध्वंस झाला आहे. अशा परिस्थितीत लोकांना युक्रेन सोडून पलायन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याचदरम्यान, युक्रेनची टेनिस स्टार डायना यास्ट्रेम्स्का हिने हल्ल्यातून वाचवण्यात यश मिळवलं.
2 / 9
रशियाच्या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. पण सुदैवाने डायना मात्र या हल्ल्याच्या वेळी देशातून पळ काढण्यात ती यशस्वी ठरली. देश सोडून पळ काढत ती हल्ल्यातून वाचली. आणि आता आठवडाभरातच तिने टेनिस क्षेत्रात मोठे यश मिळवले.
3 / 9
युक्रेन सोडल्यानंतर डायना थेट फ्रान्सला पोहोचली. तिथे ती २६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ल्योन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत खेळणार होती. या स्पर्धेत डायनाने उपांत्य फेरीच्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करत मोठा पराक्रम केला. तसेच, या विजयानंतर तिला अश्रू अनावर झाले.
4 / 9
युक्रेनियन टेनिस स्टार आणि जागतिक क्रमवारीत १४०व्या क्रमांकावर असलेल्या डायना यास्ट्रेम्स्का हिने रोमानियन स्टार सोराना क्रिस्टी (Sorana Cîrstea) हिचा पराभव केला. युक्रेनियन स्टारने सोरानाचा ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
5 / 9
सोराना ही जागतिक क्रमवारीत ३०व्या क्रमांकावर आहे. पण तर डायना ही टॉप 100 मध्येही नाही. त्यामुळे ती सामना जिंकेल असं आधी कोणालाही वाटलं नव्हतं. डायनाची आता अंतिम फेरीत चीनच्या झांग शुईशी लढत होईल.
6 / 9
सेमीफायनल जिंकल्यानंतर डायनाने युक्रेनचा झेंडा आपल्या खांद्यावर फडकवला. तिने गेल्या आठवड्यात युक्रेन सोडलं आणि रशियन बॉम्बहल्ल्यातून सुटून फ्रान्सला पोहोचली. अशा परिस्थितीत सामना जिंकल्यानंतर डायनाने आपल्या देशासाठीच्या भावना व्यक्त केल्या.
7 / 9
'माझे मनोबल अजूनही खूप मजबूत आहे. त्यामुळे मी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकते. मी युक्रेनियन आहे आणि युक्रेनचे लोक खूप मजबूत असतात', असं डायना म्हणाली.
8 / 9
'आता सुरू असलेल्या युद्धातही आमचा लढवय्या स्वभाव तुम्ही पाहू शकता. आता मी जे काही जिंकेन, ते माझ्या देशाला समर्पित करेन', असं डायनाने सांगितलं.
9 / 9
२१ वर्षीय डायना यास्ट्रेम्स्काने तिच्या कारकिर्दीत ३७ एकेरी सामने खेळले. त्यापैकी ३० सामने तिने जिंकले. तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम जागतिक क्रमवारी ही ८२ क्रमांक आहे. ग्रँड स्लॅम जिंकणं हे तिचं स्वप्न आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाTennisटेनिसwarयुद्ध