शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jiselle Arianne, Russia Ukraine War: "हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये भिड"; तरूणीने थेट Vladimir Putin यांनाच दिलं 'चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 8:50 PM

1 / 9
Vladimir Putin Jiselle Arianne, Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. जवळपास महिन्याभरापासून हे युद्ध अखंड सुरूच आहे. या युद्धामुळे जग दोन गटांत विभागलं गेलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
2 / 9
अमेरिका, ब्रिटन यांसारखे देश सध्या रशियाच्या विरोधात उभे आहेत. तर सीरिया, चीन यांसारख्या देशांनी रशियाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांची महत्त्वाकांक्षा वाढतच आहे.
3 / 9
यादरम्यान एका सुंदर तरूणीने पुतीन यांना थेट बॉक्सिंग रिंगमध्ये भिडण्याचं आव्हान दिलं आहे.
4 / 9
बॉक्सिंग रिंग गर्ल जिसल एरियन ( Jiselle Arianne ) हिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बॉक्सिंग रिंगमध्ये लढण्याचे आव्हान दिले आहे.
5 / 9
६९ वर्षीय पुतीन यांना रिंगमध्ये आक्रमक प्रत्युत्तर देण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
6 / 9
फ्लोरिडामधील ऑरलँडो शहरात बाली स्पोर्ट्समध्ये खेळणाआधी एरियन म्हणाली, 'हिंमत असेल तर पुतीन यांनी माझ्याशी बॉक्सिंग रिंममध्ये खेळावं.'
7 / 9
'पुतीन माझ्याविरोधात बॉक्सिंग रिंग मध्ये खेळण्यास तयार झाले तर खूप बरं होईल. मला युद्धाचा निषेध करता येईल. मी पुतिनविरुद्ध रिंगमध्ये आक्रमकपणे खेळेन.' असंही ती म्हणाली.
8 / 9
एरियनने आव्हान दिलेल्या पुतिन यांच्याकडे तायक्वांडोमधील मानद ब्लॅक बेल्ट होता. पण जागतिक तायक्वांडो महासंघाने गेल्या महिन्यात रशियाच्या हल्ल्याचा निषेध करत तो सन्मान रद्द केला.
9 / 9
पुतीन यांना तायक्वांडो, मार्शल आर्ट्सची अशा खेळांची चांगली माहिती आहे. तरीदेखील एरियनने त्यांना आव्हान देण्याचं धाडस केलं आहे. (सर्व फोटो - Instagram)
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धboxingबॉक्सिंग